हातउसने पैसे घेऊन एकास पाच लाखाला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:47 IST2021-03-13T04:47:49+5:302021-03-13T04:47:49+5:30
सांगली : आर्थिक अडचण असल्याचे कारण देऊन एकाकडून पाच लाखांची रक्कम घेऊन ती देण्यास टाळाटाळ करणाऱ्यावर पोलिसात गुन्हा दाखल ...

हातउसने पैसे घेऊन एकास पाच लाखाला गंडा
सांगली : आर्थिक अडचण असल्याचे कारण देऊन एकाकडून पाच लाखांची रक्कम घेऊन ती देण्यास टाळाटाळ करणाऱ्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्वप्नज सुरेश समराई (वय २९, रा. जयसिंगपूर) यांनी संदीप महादेव गावडे (वय ३८ रा. चिपरी, ता. हातकणंगले) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी स्वप्नज व संशयितांमध्ये मित्रत्वाचे संबंध होते. याच विश्वासातून आर्थिक अडचण असल्याचे सांगत हातउसणे म्हणून पाच लाख रुपये घेतले होते. ही रक्कम घेताना संशयिताने वेळेत रक्कम अदा करण्याची हमी दिली होती व चेक वटणार असल्याचे सांगितले होते मात्र, चेक न वटल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी स्वप्नज यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. १५ फेब्रुवारी २०१६ पासून आतापर्यंत येथील एका बँकेत हा प्रकार घडल्याने विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.