शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

'तुमचा भाऊ आहे, काळजी करू नका', शिरसगाव सौर ऊर्जा प्रकल्प प्रश्न सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 18:54 IST

Sangli News: शिरसगाव तालुका कडेगाव येथील गायरान जमिनीत  उषोषण करणारे माजी  सरपंच संभाजी मांडके यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी  फोनद्वारे संवाद साधला. येथील उपोषणकर्ते आणि ग्रामस्थ यांच्या मागण्यांबाबत  लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

- प्रताप महाडिक सांगली शिरसगाव तालुका कडेगाव येथील गायरान जमिनीत  उषोषण करणारे माजी  सरपंच संभाजी मांडके यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी  फोनद्वारे संवाद साधला. येथील उपोषणकर्ते आणि ग्रामस्थ यांच्या मागण्यांबाबत  लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिलं आहे. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी मुंबई येथे  मंत्रालयात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जावून त्यांची भेट घेतली.

यावेळी आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी शिरसगाव येथे मागील सहा दिवसांपासून  उपोषणास बसलेले  संभाजी मांडके व आंदोलक ग्रामस्थ यांच्या  मागण्यांबाबत मुख्यमंत्री यांचेशी सविस्तरपणे चर्चा केली व उपोषणकर्ते संभाजी मांडके यांच्याशी फोनवरून संपर्क साधून दिला. यावेळी संभाजी मांडके यांच्याशी फोनवरून  बोलताना मुख्यमंत्री  म्हणाले तुमचे आमदार विश्वजित  यांचेशी आपल्या व ग्रामस्थांच्या  मागण्यांबाबत  सविस्तरपणे चर्चा  झाली आहे.मी मुख्यमंत्री तुमचा भाऊ आहे, काळजी करु नका'!  सौर ऊर्जा प्रकल्पाला गायरान जमीन गेल्यामुळे गावाला गायरान शिल्लक राहत नाही यावर आपण नक्कीच मार्ग काढूअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या गायरान जमिनीतील वनीकरण क्षेत्रात  बेसुमार वृक्षतोड झाली आहे यावर मार्ग म्हणून वनविभागामार्फत गावात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करू.याशिवाय गावातील भूमिपुत्रांना या प्रकल्पात नोकरी द्यावी या मागणीबाबतही सकारात्मक निर्णय घेणार आहे.असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरसगाव येथील  उपोषणकर्त्यांना फोन कॉलद्वारे आश्वासन दिलं आहे.

टॅग्स :SangliसांगलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVishwajeet Kadamविश्वजीत कदम