शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: खून झाल्याची पोलिसांना दिली खोटी माहिती, उत्तरप्रदेशच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

By शीतल पाटील | Updated: August 11, 2023 14:34 IST

दारूच्या नशेत पोलिसांना चुकीची माहिती दिल्याचे स्पष्ट झाले

कुपवाड : नागरीकांच्या सोयीसाठी निर्माण केलेल्या ११२ क्रमांकावरून मिरज एमआयडीसीत खून झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिल्याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदीप धुपेंद्रसिंह पटेल (वय ३६, सध्या रा. सुपर क्राॅप्ट कंपनी समोर मिरज एमआयडीसी. मूळ गाव गोरखपूर, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री मिरज एमआयडीसीतील एका कारखान्यातून संशयित सुदीप पटेल या तरुणाने ११२ या नंबरवर मिरज एमआयडीसीतील सुपर क्राॅप्ट या कंपनीजवळ खून झाल्याची माहिती दिली. माहिती मिळताच कुपवाड व मिरज या दोन्ही पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना तेथे काहीही आढळून आले नाही. पोलिसांनी संशयित सुदीप पटेल याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता मोबाईल बंद असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी परिसरातील झाडेझुडपे आणि काट्याकुट्यात कसरतीची पायपीट करत बारकाईने शोध घेतला असता त्यांना एकजण मद्यधुंद अवस्थेत पडलेला दिसून आला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता मीच फोन केला असल्याची कबुली पोलिसांना दिली. तसेच इथे काही घडले नाही तुम्ही परत जा असे पोलिसांना त्याने सांगितले.

दरम्यान, संशयिताने कोणतीही घटना घडली नसताना दारूच्या नशेत पोलिसांना चुकीची माहिती दिल्याचे स्पष्ट झाले. या न घडलेल्या घटनेची खोटी माहिती देत पोलिसांची फसवणूक केल्याबद्दल त्या तरूणाच्याविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. निष्कारण झालेल्या त्रासाबद्दल पोलिसांनी संशयिताचा चांगलाच पाहुणचार केला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस