आष्ट्यात पोलीस असल्याचे भासवून वृद्धाला फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST2021-04-09T04:29:43+5:302021-04-09T04:29:43+5:30

आष्टा : येथील यशवंत आकाराम सिद्ध (६) या वृद्धाच्या हातातील ४० हजारांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या चोरट्यांनी पोलीस असल्याचे ...

He deceived the old man by pretending to be a policeman in Ashta | आष्ट्यात पोलीस असल्याचे भासवून वृद्धाला फसवले

आष्ट्यात पोलीस असल्याचे भासवून वृद्धाला फसवले

आष्टा :

येथील यशवंत आकाराम सिद्ध (६) या वृद्धाच्या हातातील ४० हजारांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या चोरट्यांनी पोलीस असल्याचे भासवून लंपास केल्या. ही घटना गुरुवारी सकाळी अकराच्या दरम्यान घडली.

सिद्ध किराणा माल आणण्यासाठी चव्हाणवाडी येथील दुकानात आले होते. तेथून जात असताना दुचाकीवरून दोन युवक आले. त्यांनी ‘लॉकडाऊन असताना सोन्याच्या अंगठ्या घालून का फिरत आहात?’ असे सांगून हातातील ४० हजारांच्या दोन अंगठ्या काढण्यास सांगितले व त्यांच्या जवळील प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेल्या ७०० रुपयांसोबत त्या ठेवल्या. मात्र, घरी जाऊन पाहिले असता पिशवीत फक्त सातशे रुपये सापडले. अंगठ्या गायब झाल्याचे लक्षात आले. सिद्ध यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

Web Title: He deceived the old man by pretending to be a policeman in Ashta