शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! दुसरीही मुलगी झाली म्हणून पत्नीस मारहाण करत घरातून हाकलले, बुधगावातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 13:13 IST

या प्रकरणी जयश्री नेताजी पाटील यांनी पती नेताजी तानाजी पाटील याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

सांगली : बुधगाव, तालुका मिरज येथे पहिली मुलगी असताना दुसरीदेखील मुलगीच झाल्याच्या रागातून पत्नीला पतीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. हा प्रकार मंगळवार दि. ७ जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बुधगाव येथे घडला. या प्रकरणी जयश्री नेताजी पाटील यांनी पती नेताजी तानाजी पाटील (वय ३५, रा. बुधगाव) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी जयश्री पाटील यांचा विवाह बुधगाव येथील नेताजी पाटील यांच्याशी झाला आहे. लग्नानंतर त्यांना पहिली मुलगी झाली. त्यानंतर कालांतराने दुसऱ्यांदा देखील मुलगीच झाल्याने नेताजी नाराज होता. मंगळवार, दि. ७ जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जयश्री पाटील या घरामध्ये काम करत असताना संशयित नेताजी पाटील हा तिथे आला. तुला दुसरी पण मुलगीच झाली आहे असे म्हणत शिवीगाळ करू लागला. तू अजून घरात का राहत आहेस, निघून जा असे म्हणाला.वाद वाढत गेल्यानंतर नेताजी याने स्वयंपाक खोलीतील मिक्सरचे भांडे हातात घेऊन शिवीगाळ करत भांडे डोक्यात मारून गंभीर जखमी केले. या प्रकारानंतर जयश्री पाटील यांनी पोलिसांत फिर्याद केली. त्यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या नेताजी पाटील याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी