हजारवाडीत वादळी वाऱ्याने विजेचा खांब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:28 IST2021-05-08T04:28:18+5:302021-05-08T04:28:18+5:30

भिलवडी : शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारवाडी (ता. पलूस) येथील एचपीसीएलसमोरील इंडस्ट्रीयल हाय होल्टेज इलेक्ट्रिक पोल ...

In Hazarwadi, a power pole collapsed due to strong winds | हजारवाडीत वादळी वाऱ्याने विजेचा खांब कोसळला

हजारवाडीत वादळी वाऱ्याने विजेचा खांब कोसळला

भिलवडी

: शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारवाडी (ता. पलूस) येथील एचपीसीएलसमोरील इंडस्ट्रीयल हाय होल्टेज इलेक्ट्रिक पोल कोसळला. एचपीसीएलसमोरून हजारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा पोल पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेची माहिती समजताच महावितरणचे साहाय्यक अभियंता एम. आर. नलवडे व वायरमन कोळी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ क्रेन मागवून पोल हटवून रस्ता मोकळा केला. हजारवाडी, भिलवडी स्टेशन परिसरात जोरदार सरी बरसल्या. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे, पाने, फांद्या पडून रस्त्यावर थर साचल्याचे चित्र होते. पावसाने शिवारात पाणीच पाणी साचले आहे.

फोटो : ०७ भिलवडी ३

ओळ : हजारवाडी (ता. पलुस) येथे वादळी पावसामुळे कोसळलेला विद्युत खांब हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.

Web Title: In Hazarwadi, a power pole collapsed due to strong winds