संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हौसाताईंचे मोठे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST2021-02-16T04:28:14+5:302021-02-16T04:28:14+5:30
हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिवीरांगना श्रीमती हौसाताई पाटील यांना उस्मानाबाद येथील भाई उद्धवराव पाटील ...

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हौसाताईंचे मोठे योगदान
हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिवीरांगना श्रीमती हौसाताई पाटील यांना उस्मानाबाद येथील भाई उद्धवराव पाटील विचारमंचच्या वतीने देण्यात येणारा उद्धवराव पाटील जीवन गौरव पुरस्कार मंत्री पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, धनंजय पाटील, प्रा. डॉ. बाबूराव गुरव, अॅड. सुभाष पाटील उपस्थित होते.
यावेळी मंत्री पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्वातंत्र्यलढ्यातील काम मोठे आहे. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून श्रीमती हौसाताई यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत स्वत:ला झोकून देऊन काम केले. त्यांना आज या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. हा सर्वात मोठा सन्मान असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार अनिल बाबर यांनी भगवानराव पाटील आणि श्रीमती हौसाताई पाटील यांच्या सामाजिक व स्वातंत्र्यलढ्यातील कामाचा गौरव केला. अॅड. सुभाष पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सुभाष पवार, क्रांतिसिंह नाना पाटील भाजी मंडईचे अध्यक्ष शंकरराव पाटील, अॅड. अविनाश देशमुख, प्रा. विलासराव पाटील, प्रकाश यादव, अंधकवी चंद्रकांत देशमुखे, रघुराज मेटकरी, प्रा. विश्वनाथ गायकवाड, सदानंद माळी, उत्कर्ष पाटील, किमया पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सागर पाटील यांनी आभार मानले.
फोटो - १५०२२०२१-विटा- क्रांतिवीरांगना पुरस्कार : हणमंतवडिये येथे क्रांतिवीरांगना श्रीमती हौसाताई पाटील यांना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते भाई उद्धवराव पाटील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार मोेहनराव कदम, आमदार अनिल बाबर, धनंजय पाटील, अॅड. सुभाष पाटील उपस्थित होते.