शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत भाजपकडून संजय पाटील यांच्या उमेदवारीची हॅट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 22:29 IST

लोकसभा निवडणूक : जिल्ह्यातील समर्थकांचा जल्लोष, धक्कातंत्राच्या चर्चेला पूर्णविराम.

अविनाश कोळी, सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी सांगली मतदारसंघात उमेदवारी जाहीर करताना भाजपकडून धक्कातंत्राचा अवलंब होणार, अशी शक्यता वर्तविली जात होती. या चर्चेला पूर्णविराम देत संजय पाटील यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी मिळविण्यात यश मिळविले. उमेदवारी जाहीर होताच जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

सलग दोनदा लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या संजय पाटील यांच्यावर पुन्हा पक्षाने विश्वास टाकला. दुसऱ्या यादीत सांगलीच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. यातून संजय पाटील यांनी उमेदवारीची हॅटट्रिक केली. महिन्याभरापासून सांगली मतदारसंघात भाजपकडून कोण उमेदवार असणार, याची चर्चा रंगली होती. पक्षांतर्गत इच्छूक वाढत असतानाच यंदा धक्कातंत्राचा अवलंब वरिष्ठ नेत्यांकडून होणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. या सर्व तर्कवितर्कांना खोटे ठरवित संजय पाटील यांनी उमेदवारी मिळविण्यात बाजी मारली.

महिन्यापूर्वी भाजपचे सांगलीतील प्रचार कार्यालय संजय पाटील यांच्या संस्थेत उभारले गेल्याने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांना होता. प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समर्थकांनी याच प्रचार कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला. तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील समर्थकांनीही फटाक्यांची आतषबाजी करीत, पेढेवाटप करीत आनंद साजरा केला. प्रचार कार्यालयात समर्थकांची गर्दीसांगलीच्या मार्केट यार्डातील भाजपच्या प्रचार कार्यालयात बुधवारी दिवसभर संजय पाटील थांबून होते. यादीत नाव येताच त्यांच्या समर्थकांनी कार्यालयात गर्दी केली. पाटील यांना पेढा भरवून आनंदा साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. ‘ठरलंय नक्की, हॅटट्रिक पक्की’, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४