हर्षदा माळी बी.एस्सी. परीक्षेत विद्यापीठात चौथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:49 IST2021-03-13T04:49:08+5:302021-03-13T04:49:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाच्या भाैतिकशास्र विभागाची विद्यार्थिनी हर्षदा राम माळी ही ...

हर्षदा माळी बी.एस्सी. परीक्षेत विद्यापीठात चौथी
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाच्या भाैतिकशास्र विभागाची विद्यार्थिनी हर्षदा राम माळी ही बी.एस्सी. पदवी परीक्षेत शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत चौथी आली.
मार्च-एप्रिल २०२०मध्ये शिवाजी विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेत हर्षदा माळी हिने ९४.५६ टक्के गुण मिळवून बी.एस्सी.च्या गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक पटकावला. महाविद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर म्हणाले की, महाविद्यालयातील विविध विभागाच्या विद्यार्थिनी दरवर्षी शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीत स्थान मिळवतात. हीच परंपरा हर्षदा माळीने कायम राखत महाविद्यालयाचा गौरव वाढविला आहे. अशा गुणवंत विद्यार्थिनींचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे.
तिला भाैतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. आर.एच. पाटील, प्रा. डॉ. टी.जे. शिंदे व प्रा. डॉ. ए.जी. भाेसले यांचे मार्गदर्शन लाभले. कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्यामराव पाटील, सचिव प्राचार्य आर.डी. सावंत, सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांनी तिचे अभिनंदन केले आहे.