हर्षद व ऐश्वर्या शहा यांची वैद्यकीय शिक्षणात गरुडझेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST2021-09-19T04:27:57+5:302021-09-19T04:27:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील डॉ. हर्षद प्रदीप शहा यांनी डॉक्टरेट इन कार्डिओलॉजी ऑफ नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनिशनने ...

Harshad and Aishwarya Shah's medical education | हर्षद व ऐश्वर्या शहा यांची वैद्यकीय शिक्षणात गरुडझेप

हर्षद व ऐश्वर्या शहा यांची वैद्यकीय शिक्षणात गरुडझेप

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : येथील डॉ. हर्षद प्रदीप शहा यांनी डॉक्टरेट इन कार्डिओलॉजी ऑफ नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनिशनने ऑगस्ट २०२१ मध्ये घेतलेल्या परीक्षेत डी.आर.एन.बी.मध्ये (कार्डिओलॉजी) उत्तीर्ण झाले, तर डॉ. ऐश्वर्या प्रदीप शहा यांची लंडनमधील बांगर युनिव्हर्सिटीमध्ये इंटिग्रेटिव्ह कौन्सिलिंग या उच्च शिक्षणासाठी निवड झाली. या बहीण-भावांनी एकाचवेळी यशाला गवसणी घातली. डॉ. हर्षद हेही पदवी संपादन करणारे वाळवा-शिराळा तालुक्यातील पहिले आहेत.

डॉ. हर्षद व ऐश्वर्या हे दोघे येथील प्रतिथयश डॉ. प्रदीप व डॉ. नीलम शहा यांची मुले आहेत. डॉ. हर्षद यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुणे येथे झाले. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतले; तर पुढील एमबीबीएस व एमडी (मेडिसीन) हे शिक्षण अहमदनगर व डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात झाले. त्यांना आई-वडिलांचा वैद्यकीय व्यवसायाचा वारसा असला, तरी कष्ट, अभ्यासातील सातत्य ठेवत त्यांनी पुढील उच्च शिक्षणासाठी होली फॅमिली हॉस्पिटल, वांद्रे मुंबई येथे प्रवेश घेतला. त्यांनी येथून डी.आर.एन.बी (कार्डिओलॉजी) ही पदवी संपादन केली.

डॉ. ऐश्वर्या यांनी एमएस्सी क्लिनिकल सायकॉलॉजी (मानसोपचारतज्ज्ञ) ही पदवी घेतली आहे. त्यांची नुकतीच लंडनमधील बांगर युनिव्हर्सिटीमध्ये इंटिग्रेटिव्ह कौन्सिलिंगच्या उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. ऐश्वर्या यांनीही जिद्द, चिकाटीच्या जोरावर दिल्ली युनिव्हर्सिटीची यंग इंडिया फेलोशिप मिळवली आहे. या दोघा भाऊ-बहिणीच्या यशाने वाळवा तालुक्याच्या उच्चशिक्षण परंपरेत मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Web Title: Harshad and Aishwarya Shah's medical education