सांगलीत अगोदर झालेली लग्ने लपवून विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:23 IST2021-04-03T04:23:55+5:302021-04-03T04:23:55+5:30

सांगली : पहिल्या लग्नाचा घटस्फोट झाल्याचे सांगून दुसरे लग्न लपवून एका महिलेचा छळ करण्यात आल्याची घटना सांगलीत घडली. लग्न ...

Harassment of married women by hiding previous marriages in Sangli | सांगलीत अगोदर झालेली लग्ने लपवून विवाहितेचा छळ

सांगलीत अगोदर झालेली लग्ने लपवून विवाहितेचा छळ

सांगली : पहिल्या लग्नाचा घटस्फोट झाल्याचे सांगून दुसरे लग्न लपवून एका महिलेचा छळ करण्यात आल्याची घटना सांगलीत घडली. लग्न लपवण्याबरोबरच दागिनेही काढून घेणाऱ्याविरोधात विश्रामबाग पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गौरी अमित जगदाळे (वय ३१, रा. विश्रामबाग, सांगली) यांनी अमित सर्जेराव जगदाळे (वय २७, रा. गोकुळधाम अपार्टमेंट, सांगली) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित अमितचे पहिले लग्न झाले असून, घटस्फोट घेतल्याचे सांगितले होते. मात्र, त्याचे दुसरे लग्न झाले असतानाही ती माहिती जाणीवपूर्वक लपविण्यात आल्याचे गौरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्याचबरोबर दागिनेही स्वत:कडे ठेवून घेतल्याचे सांगत छळ केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार विश्रामबाग पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Harassment of married women by hiding previous marriages in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.