कृष्णत चन्ने यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:49 IST2021-02-06T04:49:48+5:302021-02-06T04:49:48+5:30

विटा : तात्काळ बॅंकिंग टेक्नॉलॉजीचे प्रणेते आणि खेराडे-वांगी (ता. कडेगाव) येथील सुपुत्र डॉ. कृष्णत चन्ने यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी ...

Happy birthday to Krishnat Channe | कृष्णत चन्ने यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

कृष्णत चन्ने यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

विटा : तात्काळ बॅंकिंग टेक्नॉलॉजीचे प्रणेते आणि खेराडे-वांगी (ता. कडेगाव) येथील सुपुत्र डॉ. कृष्णत चन्ने यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

गो-कॅशलेस इंडिया प्रा. लि. चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. कृष्णत चन्ने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या खेराडे-वांगी येथील निवासस्थानी लोकांनी गर्दी केली होती. सकाळी पत्नी सविता यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी मातोश्री सुंदराबाई चन्ने यांनी त्यांना आशीर्वाद देऊन सदिच्छा दिल्या. वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. चन्ने यांनी श्रीराम विद्यालयातील विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपयांच्या वह्यांचे वाटप केले. यावेळी युवा नेते डॉ. जितेश कदम, डी. के. कदम, न्यायाधीश गणी नदाफ, डॉ. आबासाहेब साळुंखे, किसन कदम, बॅंकोचे संस्थापक अविनाश शिंत्रे, नीलेश खडके, आप्पा जंगम, बाळासाहेब सोनवणे, डॉ. रोहिदास सूर्यवंशी, सुभाष देशमुख, हणमंतराव कदम, राजू सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, अभिजित सूर्यवंशी, जालिंदर सुतार, अधिक मोहिते, सत्यवान मोहिते, विशाल कोळी, दिलीप सूर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या.

प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, आबासाहेब जगताप, बाळासाहेब झावरे, डॉ. विक्रमसिंह कदम, कार्याध्यक्ष अशोक पाटील, डॉ. अर्जुन नितीनवार, सिध्देश्वर पुस्तके, अ‍ॅड. महेश शानबाग, सुनील गुरव, मंगेश बनसोडे, प्रताप पाटील, नामदेव रेपे, कृष्णा पोळ यांच्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांतून विविध मान्यवरांनी डॉ. कृष्णत चन्ने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

फोटो - ०५०२२०२१-विटा-चन्ने सर सत्कार

ओळ : खेराडे-वांगी (ता. कडेगाव) येथे तात्काळ बॅंकिंगचे प्रणेते डॉ. कृष्णत चन्ने यांना युवक संघटनेच्यावतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Web Title: Happy birthday to Krishnat Channe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.