शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील पुणदी तर्फ वाळव्यात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 17:43 IST

पुणदी येथील हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी ४ कोटी ७१ लाख रुपयाचा निधी मंजुर असल्याचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सांगितले.

दुधोंडी : पलूस तालुक्यातील पुणदी तर्फ वाळवा येथे नवसाला पावणारा मारुती राया अशी ख्याती असलेला हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी ड्रोनच्या मध्यामातून आकाशातून पुष्पवृष्टी करण्यात आली.  या उत्सव सोहळ्यास पहाटेपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महिलांची गर्दी ही लक्षणीय होती.

सकाळी साडेसहा वाजता सांप्रदायिक भजनी मंडळाचे वतीने गुलाल पुष्पांच्या वर्षावात श्री मारुती देवाचा जन्मकाळ साजरा करण्यात आला.  यावेळी सुंठवडा प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच सकाळी 9 ते 12 या वेळेत भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी चार वाजता आंबील नैवेद्याच्या बैलगाड्यांची मिरवणूक हजारो भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात  आली.उद्या, रविवारी (दि.१७) यात्रेच्या दुसऱ्या दिवशी  सकाळी दहा वाजता नागरिकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा तसेच दुपारी चार वाजता भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केल्याची माहिती संयोजकच्या वतीने देण्यात आली. पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी हनुमान केसरी किताब व चांदीची गदा प्रदान करण्यात येणार असल्याचेही सांगितले.या उत्सव काळात राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, सांगली जिल्हा बँकेचे संचालक महेंद्रा लाड, जिल्हा परिषद सदस्या अश्विनी पाटील, मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव व हजारो भाविकांची उपस्थिती होती. पुणदी येथील हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी ४ कोटी ७१ लाख रुपयाचा निधी मंजुर असल्याचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीHanuman Jayantiहनुमान जयंती