किंगमेकर रेठरेहरणाक्षला इच्छुकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST2021-05-28T04:20:05+5:302021-05-28T04:20:05+5:30

बोरगाव : रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) हे कृष्णा कारखान्याच्या सत्तासंघर्षात घाटाखालचे महत्त्वाचे व ‘किंगमेकर’ समजले जाणारे गाव आहे. सांगली-साताऱ्याच्या सीमेवरील ...

A handful of aspirants to Kingmaker Rethareharanaksha | किंगमेकर रेठरेहरणाक्षला इच्छुकांची मांदियाळी

किंगमेकर रेठरेहरणाक्षला इच्छुकांची मांदियाळी

बोरगाव : रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) हे कृष्णा कारखान्याच्या सत्तासंघर्षात घाटाखालचे महत्त्वाचे व ‘किंगमेकर’ समजले जाणारे गाव आहे. सांगली-साताऱ्याच्या सीमेवरील या गावातून ‘कृष्णा’च्या रणांगणात अनेक दिग्गज उतरतात. त्यांच्यात टोकाचा संघर्षही पाहायला मिळतो. यंदाही इच्छुकांची रेलचेल सर्वच पॅनेलच्या नेत्यांची डोकेदुखी बनली आहे.

रेठरेहरणाक्ष या एकट्या गावात १,१५५ मतदान आहे. त्यामुळे कारखाना स्थापनेपासून येथे खुल्या गटातीलच उमेदवार दिला जातो. सत्ताधारी सहकार पॅनेलकडून मांदियाळी आहे.

विद्यमान संचालक सुजित मोरे पुन्हा इच्छुक आहेत. दोन पिढ्यांपासून भोसले गटाचे हुकुमी कुटुंब अशी त्यांची ओळख आहे. माजी सरपंच जे. डी. मोरे व माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मोरे यांचे पुत्र अविनाश मोरे, प्राचार्य डाॅ. बाबुराव पवार यांनीही उमेदवारीसाठी रेटा लावला आहे. भाजपचे वाळवा तालुकाध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी भाजपच्या माध्यमातून ‘फिल्डिंग’ लावली आहे.

संस्थापक पॅनेलच्या अविनाश मोहितेंचे निकटवर्तीय केदार शिंदे यांचा मागील वेळी मोजक्या मतांनी पराभव झाला होता. त्यांच्यासोबत महेश पवार यंदा इच्छुक आहेत. ते भाजयुमोचे माजी तालुकाध्यक्ष आहेत. ‘संस्थापक’कडून भवानीनगरचे ग्रामपंचायतीतील सत्ताधारी भरत कदम यांनीही तयारी केली आहे.

रयत पॅनेलकडून ॲड. विवेकानंद मोरे, माजी उपाध्यक्ष व यशवंतराव मोहिते यांचे निकटवर्तीय सहकारी दिवंगत संपत भैरू मोरे यांचे पुत्र विश्वास ऊर्फ दिलीप मोरे यांनी तयारी केली आहे.

Web Title: A handful of aspirants to Kingmaker Rethareharanaksha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.