हल्याळ येथे चाैघे भाऊ कृष्णेत वाहुन गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:19 IST2021-06-29T04:19:17+5:302021-06-29T04:19:17+5:30
फाेटाे : २८ सदाशिव बनसाेडे फाेटाे : २८ दऱ्याप्पा बनसाेडे फाेटाे : २८ शंकर बनसाेडे फाेटाे : २८ अथणी ...

हल्याळ येथे चाैघे भाऊ कृष्णेत वाहुन गेले
फाेटाे : २८ सदाशिव बनसाेडे
फाेटाे : २८ दऱ्याप्पा बनसाेडे
फाेटाे : २८ शंकर बनसाेडे
फाेटाे : २८ अथणी १
ओळ : हल्याळ (ता. अथणी) येथे चाैघे भाऊ कृष्णेत वाहून गेल्याची माहिती मिळताच प्रशासनाकडून तत्काळ नदीपात्रात शाेधमाेहीम सुरू करण्यात आली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
अथणी : हल्याळ (ता. अथणी) येथे गावच्या उरुसानिमित्त कृष्णा नदीकाठावर धुणे धुण्यासाठी गेलेले बनसाेडे कुटुंबातील चाैघे भाऊ पाण्यात वाहून गेले. ही घटना साेमवारी दुपारी ३ वाजता घडली. पाण्यात पडलेल्या एका भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात चाैघेही वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत बचाव पथकांकडून नदीपात्रात शाेधमाेहीम सुरू हाेती.
परसराम गाेपाळ बनसाेडे (वय ३६), सदाशिव गाेपाळ बनसाेडे (वय २४), दऱ्याप्पा गाेपाळ बनसाेडे (वय २२), शंकर गाेपाळ बनसाेडे (वय १८) अशी वाहून गेलेल्या चाैघा भावंडांची नावे आहेत.
हल्याळ येथे गुरुवारी ऊरुस भरणार आहे. परंपरेप्रमाणे कुटुंबातील महिलांऐवजी चाैघे भाऊ घरातील अंथरुण-पांघरुण व अन्य धुणे धुण्यासाठी नदीकाठावर गेले हाेते. यावेळी अचानक पाय घसरून सदाशिव हा पाण्यात पडला. यावेळी परसराम त्याच्या मदतीसाठी धावला. दाेघेही पाण्यात वाहून जात असल्याचे पाहून दऱ्याप्पा व शंकर यांनीही त्यांच्या मदतीसाठी पाण्यात उड्या घेतल्या. सध्या नदीला माेठ्या प्रमाणात पाणी असल्याने चाैघेही पाण्यात वाहून जाऊ लागले.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. अथणी पाेलिसांचे पथकही तात्काळ हल्याळ येथे दाखल झाले. उपअधीक्षक एस. व्ही. गिरीश, तहसीलदार दुंडाप्पा काेमर, वरिष्ठ पाेलीस निरीक्षक शंकरगाैडा बसगाैडर, पाेलीस उपनिरीक्षक कुमार हडकर यांनी तातडीने यंत्रणा राबवून शाेधमाेहीम सुरू केली. एनडीआरएफचे पथकही मदतीसाठी बाेलावण्यात आले. अथणीतील अग्निशमन दल तसेच स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शाेधमाेहीम सुरू हाेती. सध्या पावसाळ्यामुळे नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. यामुळे शाेधकार्यात अडचणी येत आहेत.
चाैकट
ऊरुसाच्या पार्श्वभूमीवर चाैघे सख्खे भाऊ नदीपात्रात वाहून गेल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. यातील परसराम व सदाशिव हे विवाहित आहेत. दाेघांना मिळून तीन मुले व तीन मुली अशी अपत्ये आहेत. तर दऱ्याप्पा व शंकर हे अविवाहित आहेत. चारीही कर्ती मुले कृष्णेच्या पात्रात वाहून गेल्याने त्यांच्या आई-वडिलांना माेठा धक्का बसला आहे.