आष्ट्यात हलगी बजाओ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:26 IST2021-02-10T04:26:14+5:302021-02-10T04:26:14+5:30
आष्टा : भाजप व निशिकांतदादा युथ फाउंडेशन यांच्या वतीने शहरात सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विकासकामांच्या ठिकाणी माहिती फलक ...

आष्ट्यात हलगी बजाओ आंदोलन
आष्टा : भाजप व निशिकांतदादा युथ फाउंडेशन यांच्या वतीने शहरात सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विकासकामांच्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात यावेत यासाठी मंगळवारी हलगी बजाओ आंदोलन करण्यात आले.
आष्टा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण माने यांनी निवेदन दिले. आष्टा शहरात सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विकासकामांच्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात यावेत व या कामाबाबत ठेकेदाराचे नाव, कामाची रक्कम, कामाची मुदत, करारनामा, आदेशाची तारीख, कामाची तारीख, कामाचा कालावधी, काम पूर्ण होण्याची तारीख, दोष दायित्व कालावधी याबाबतचा माहितीचा फलक लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी विरोधी पक्षनेते वीर कुदळे, शिवसेनेचे अध्यक्ष राकेश आटुगडे, नंदकिशोर आटुगडे, अविनाश काळोखे उपस्थित होते.
फोटो : ०९०२२०२१-आष्टा पालिका निवेदन न्यूज
: आष्टा पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना निवेदन देताना प्रवीण माने, वीर कुदळे, राकेश आटुगडे, नंदकिशोर आटुगडे, शोएब संदे ,सचिन रासकर.