लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना झाल्यानंतर शरीरावर झालेला औषधांचा मारा आणि आजारामुळे वाढलेली चिंता यामुळे डोक्यावरील केस गळतीची समस्या अनेकांना सतावत आहे. तज्ज्ञांच्या मते या केसगळतीचे टेन्शन न घेता काही उपाय करता येऊ शकतात. रुग्णालयात दाखल होऊन कोरोनामुक्त झालेल्या लोकांमध्ये केसगळतीची समस्या अधिक आहे. चिंतेतून केसगळती आणि केसगळतीतून पुन्हा चिंता असा विचित्र प्रवास काही लोकांचा होत आहे. अशावेळी त्यांनी चिंता सोडून आनंदी राहणे महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
चौकट
कोविडनंतर ३ महिन्यांनंतर गळू लागतात केस
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते कोविड होऊन गेल्यानंतर अडीच ते तीन महिन्यांनंतर केसगळतीची समस्या उद्भवू शकते. कोरोनासारखा आजार झाल्यावर शरीराच्या अंतर्गत भागात सूज येते आणि त्यामुळे टेलोजेन एफ्लुवियम ज्या स्टेजला टी.ई. म्हटले जाते, या स्टेजमध्ये डोक्यावरील केस गळण्याचे प्रमाण वाढते.
चौकट
हे करा
योग्य आहारासोबत पुरेशी विश्रांती घ्यायला हवी.
डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधे घ्यावीत.
व्हिटॅमिन बी, कॉम्प्लेक्स बायोटिन, व्हिटॅमिन डी ३ सप्लिमेंट्स, हाय प्रोटिन डायटच्या सेवनाने शरीरातील कमतरता भरून काढता येते.
याशिवाय तणावमुक्त जीवनशैलीचा अंगीकार करणेही आवश्यक आहे.
चौकट
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करा घरगुती उपाय
त्वचारोग तज्ज्ञ दयानंद नाईक यांनी सांगितले की, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्याचा प्रयत्न करावा
भरपूर पाणी पिणे, हिरव्या पालेभाज्या, फळे, दुग्धजन्य पदार्थ यामधून प्रोटिन्स, मिनरल्स् शरीराला मिळतात.
कोरोना रिकव्हरीनंतर ३ ते ४ महिने केस गळती होऊ शकते. त्यापेक्षा जास्त दिवस केसगळती सुरू असेल तर, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कोट
प्रोटीन, आयर्न, कॅल्शिअम यांच्यासह रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याने कोरोनानंतर अडीच ते तीन महिन्यांनंतर केसगळती होऊ शकते. अशावेळी भरपूर पाणी पिणे, प्रोटीनयुक्त आहार घ्यावा. अशा काही उपाययोजनांच्या माध्यमातून डाॅक्टरांच्या सल्ल्यातून केसगळती थांबून केस पुन्हा येऊ शकतात.
- डॉ. दयानंद नाईक, त्वचारोग तज्ज्ञ