मिरज, दिघंची, कर्नाळमध्ये चार लाखांचा गुटखा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:58 IST2021-09-02T04:58:02+5:302021-09-02T04:58:02+5:30

सांगली : बंदी असतानाही विक्रीसाठी गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूचा साठा करून ठेवणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. ...

Gutka stocks worth Rs 4 lakh seized in Miraj, Dighanchi, Karnal | मिरज, दिघंची, कर्नाळमध्ये चार लाखांचा गुटखा साठा जप्त

मिरज, दिघंची, कर्नाळमध्ये चार लाखांचा गुटखा साठा जप्त

सांगली : बंदी असतानाही विक्रीसाठी गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूचा साठा करून ठेवणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. जिल्ह्यात तीन ठिकाणी कारवाई करत चार लाख नऊ हजार ७६३ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

कृष्णाघाट रोड, मिरज येथे महेश बाबगोंडा पाटील याच्यावर कारवाई करत सात हजार ९६५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. दिघंची (ता. आटपाडी) येथे आसिफ इसाक तांबोळी याच्यावर कारवाई करत तीन लाख १५ हजार ४०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. कर्नाळ (ता. मिरज) येथे अरमान ट्रेडर्सवर कारवाई करत ८६ हजार ३९५ रुपयांचा साठा जप्त करत तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने ३० व ३१ ऑगस्ट रोजी ही कारवाई केली.

Web Title: Gutka stocks worth Rs 4 lakh seized in Miraj, Dighanchi, Karnal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.