खानापूर तालुक्यात गुरुजींची ‘फिल्डिंग’

By Admin | Updated: March 11, 2015 00:05 IST2015-03-10T23:44:50+5:302015-03-11T00:05:09+5:30

शिक्षक बँक निवडणूक : तिरंगी लढतीत रंगत

Guru's 'fielding' in Khanapur taluka | खानापूर तालुक्यात गुरुजींची ‘फिल्डिंग’

खानापूर तालुक्यात गुरुजींची ‘फिल्डिंग’

विटा : प्राथमिक शिक्षक बॅँकेच्या निवडणुकीसाठी खानापूर तालुक्यात शिक्षकांनी मोठी फिल्डिंग लावली आहे. महिनाभरावर येऊन बॅँकेच्या निवडणुकीत इच्छुकांची मांदियाळी असून, प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक संघाचे दोन गट अशी तिरंगी लढत झाल्यास खानापूर तालुक्यातील सहा उमेदवारांना संधी मिळणार आहे.विविध वादांमुळे चर्चेचा विषय ठरणारी प्राथमिक शिक्षक बॅँक शालेय वार्षिक परीक्षेच्या अंतिम टप्प्यात गुरुजींच्या मोर्चेबांधणीमुळे आणखी प्रकाशात आली आहे. तालुक्यातील अनेक गुरुजींनी उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवले आहेत. खानापूर तालुक्यात प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक संघ (शि. द. पाटील गट) व शिक्षक संघ (संभाजीराव थोरात गट) अशा तीन संघटना आहेत. या बॅँकेचे विटा शहरासह खानापूर तालुक्यात सुमारे ४६५ सभासद मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत माहुली येथील महेश शरनाथे व सतीश पाटील समितीतून निवडून आले. त्यावेळी संघाचे उमेदवार प्रभाकर भोसले व धनाजी घाडगे यांचा त्यांनी पराभव केला. सतीश पाटील यांनी अध्यक्षपदाची मुदत संपताच समितीला रामराम ठोकला. सध्या ते थोरात गटात आहेत. शिक्षक समितीचे खानापूर तालुकाध्यक्ष म्हणून मोहन शिंदे (लेंगरे), शि. द. पाटील गटाचे संतोष जगताप (बामणी) व संभाजी थोरात गटाचे धनाजी घाडगे (देविखिंडी) हे तालुकाध्यक्ष आहेत.
बॅँकेची निवडणूक व संघटना बांधणीतून शिल्लक राहिलेल्या वेळेत शिक्षकांनी अध्यापन सुरू केल्याचे बोलले जाते. त्यामुळे मुलांचे भवितव्य अधांतरी आहे. (वार्ताहर)

तालुक्यातील इच्छुक
बँकेत खानापूर तालुक्यातील दोन संचालक असतात. यावेळी ही निवडणूक तिरंगी होणार आहे. शिक्षक समितीचे महेश शरनाथे (माहुली), प्रकाश चव्हाण (खानापूर), राजाराम शिंदे (भाळवणी) व बाळासाहेब आडके (जोंधळखिंडी) हे, तर शिक्षक संघातील थोरात गटाचे सतीश पाटील (माहुली), सुनील गुरव (चिखलहोळ), धनाजी घाडगे (देविखिंडी) आणि शि. द. पाटील गटातील प्रभाकर भोसले (माहुली), संतोष जगताप (बामणी) व राजू राजे (वाझर) इच्छुक आहेत.
ॉँकेवर माहुलीने आजपर्यंत वर्चस्व कायम ठेवले. सुरुवातीला शि. या. माने, ज्ञानदेव भोसले, मोहन शरनाथे, सतीश पाटील हे सर्वजण माहुली गावचे आहेत. या सर्वांनी संचालक व अध्यक्षपद भूषविले. अध्यक्ष महेश शरनाथे माहुलीचेच रहिवासी आहेत.

Web Title: Guru's 'fielding' in Khanapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.