जिल्हा परिषदेच्या पुरस्कारासाठी गुरुजींची फिल्डींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:58 IST2021-09-02T04:58:27+5:302021-09-02T04:58:27+5:30

सांगली : जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या शिक्षक पुरस्कार निवड समितीची बैठक गुरुवार, दि. २ रोजी होणार आहे. दहा तालुक्यांतून ...

Guruji's fielding for Zilla Parishad award | जिल्हा परिषदेच्या पुरस्कारासाठी गुरुजींची फिल्डींग

जिल्हा परिषदेच्या पुरस्कारासाठी गुरुजींची फिल्डींग

सांगली : जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या शिक्षक पुरस्कार निवड समितीची बैठक गुरुवार, दि. २ रोजी होणार आहे. दहा तालुक्यांतून वीस प्रस्तावांची छाननी करुन नावे निश्चित केली जाणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत पुरस्कार मिळवण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडे शिक्षकांनी फिल्डींग लावल्याचे चित्र दिसत आहे.

शिक्षक दिनानिमित्ताने जिल्हा परिषदेतर्फे शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. या पुरस्कारासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पात्र शिक्षकांकडून प्रस्ताव मागवले आहेत. या प्रस्तावांची छाननी निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे. या समितीची अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी चार वाजता बैठक होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, शिक्षण सभापती आशा पाटील, समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, समितीचे सदस्य अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य आणि प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार आपल्यालाच मिळावा, यासाठी पात्र शिक्षकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पदाधिकारी आणि नेत्यांकडे त्यासाठी फिल्डींग लावली आहे.

शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षण विभागाकडे जिल्ह्यातून २० शिक्षकांचे प्रस्ताव आले आहेत. या प्रस्तावांची गुरुवारी छाननी केली जाणार आहे. या छाननीनंतर अंतिम नावे निवडली जातील. मात्र, नियमानुसार पात्र असलेल्या शिक्षकांचीच निवड केली जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

Web Title: Guruji's fielding for Zilla Parishad award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.