गुंडेवाडीत माकडाने हनुमान मंदिरात सोडले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:28 IST2021-01-03T04:28:42+5:302021-01-03T04:28:42+5:30

मिरज तालुक्यातील गुंडेवाडी गावात पुरातन दक्षिणामुखी हनुमान मंदिरात एक माकड आले. शनिवार असल्याने ग्रामस्थ दर्शनासाठी येत ...

In Gundewadi, a monkey left his life in Hanuman temple | गुंडेवाडीत माकडाने हनुमान मंदिरात सोडले प्राण

गुंडेवाडीत माकडाने हनुमान मंदिरात सोडले प्राण

मिरज तालुक्यातील गुंडेवाडी गावात पुरातन दक्षिणामुखी हनुमान मंदिरात एक माकड आले. शनिवार असल्याने ग्रामस्थ दर्शनासाठी येत होते. यावेळी अचानक माकड मंदिरात अवतरले. माकडाने देवतांना हात जोडून प्रणाम करून मंदिराच्या गाभाऱ्याच्या उंबऱ्यावर प्राण सोडला. शनिवारी मंदिरात भाविकांसमोरच माकडाने मूर्तीला दंडवत घालत प्राण सोडल्याने ग्रामस्थ अचंबित झाले. गुंडेवाडीतील पुरातन मारुती मंदिराचा पाच वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराशेजारी झाडावर अनेक माकडे बसतात. वानर मंदिरात येऊन हनुमानाच्या मूर्तीला नमन करीत असल्याची बातमी गावात पसरल्यानंतर मंदिरात गर्दी जमली. मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिराच्या दारात बसलेल्या माकडाचे भाविक लांबून दर्शन घेऊन जात होते. मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्याच्या उंबऱ्याजवळ माकड बराच वेळ तेथेच बसले. काही वेळानंतर माकडाची हालचाल बंद झाली. माकडाची हालचाल बंद झाल्याने ग्रामस्थांनी जवळ जाऊन पाहिले असता, माकड गतप्राण झाले होते. ग्रामस्थांनी टाळ-मृदंगाचा जयघोष करत मृत माकडावर मंदिराशेजारीच अंत्यसंस्कार केले.

Web Title: In Gundewadi, a monkey left his life in Hanuman temple