सभा गुंडाळली : सांगली कॉंग्रेस-राष्ट्रवादी सदस्यांत तू-तू, मैं-मैं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 07:29 PM2018-02-20T19:29:38+5:302018-02-20T19:32:37+5:30

सांगली : आरक्षण उठविण्याचा बाजार गेल्या काही दिवसांपासून मांडला गेल्याने याचे पडसाद मंगळवारी महापालिकेच्या सभेत उमटले. सत्ताधारी कॉंग्रेस आणि विरोधी राष्ट्रवादी सदस्य यांच्यात वादावादी झाल्यानंतर

Gundalali meeting: Sangli Congress-NCP members, Tu-Tu, me-I | सभा गुंडाळली : सांगली कॉंग्रेस-राष्ट्रवादी सदस्यांत तू-तू, मैं-मैं

सभा गुंडाळली : सांगली कॉंग्रेस-राष्ट्रवादी सदस्यांत तू-तू, मैं-मैं

Next

सांगली : आरक्षण उठविण्याचा बाजार गेल्या काही दिवसांपासून मांडला गेल्याने याचे पडसाद मंगळवारी महापालिकेच्या सभेत उमटले. सत्ताधारी कॉंग्रेस आणि विरोधी राष्ट्रवादी सदस्य यांच्यात वादावादी झाल्यानंतर मंजुरीच्या घोषणाबाजीत महासभा गुंडाळण्यात आली.

महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी महापौर हारुण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरुवातीलाच मागील १९ जानेवारी २0१८ च्या सभेचे इतिवृत्त मंजूर करण्याचा विषय घेण्यात आला. त्यावेळी महापौरांनी विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपांचा दाखला देत इतिवृत्ताचे सविस्तर वाचन करण्यास सांगितले. आरक्षणांच्या संदर्भात ज्या नगरसेवकांनी उपसूचना दिल्या आहेत त्यांची इतिवृत्तातील नावेही जाहीर करण्याची सूचना महापौरांनी केली. त्यामुळे उपसूचना दिलेल्या सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांनी याची गरज नसल्याचे मत मांडले. दुसरीकडे विरोधी राष्टÑवादी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत आरक्षण उठविण्याचे ठराव घुसडण्यात आल्याचा आरोप महापौरांवर केला. त्यामुळे महापौरही संतापले. नावांचे वाचन झाल्यावर नेमके हे उद्योग कोणी केले हे कळेल, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादी सदस्यांना दम भरला.

राष्ट्रवादी सदस्य व माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी इतिवृत्तातील सर्वच ठराव प्रलंबित ठेवण्याची मागणी यावेळी केली. त्याचवेळी सत्ताधारी गटातील सदस्य उभे राहिले. दोन्ही गटातील सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत एकमेकांची उणी-दुणी काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतप्त महापौरांनी सभा गुंडाळली. मंजुरीच्या घोषणा सदस्यांनी दिल्या.
महासभेनंतर पत्रकारांशी बोलताना महापौर शिकलगार म्हणाले की, आरक्षणासंदर्भात नगरसेवकांनी उपसूचना दिल्या असल्या तरी त्या आंधळेपणाने आम्ही मान्य करणार नाही. प्रशासन संबंधित उपसुचनांची दखल घेऊन प्रत्यक्ष जागांची पाहणी करेल आणि याविषयीची टिपणी देणार आहे. ज्याठिकाणचे आरक्षण घरांना बाधा करीत असेल त्याच आरक्षणांबाबत फेरबदल होतील, अन्यथा कोणतीही आरक्षणे रद्द अथवा बदलली जाणार नाही, असे स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते म्हणाले की, महापौरांनी महासभेतून पळ काढून आमच्या संशयाला बळ दिले आहे. आजही आम्ही आरक्षण उठविण्याच्या विरोधातच आहोत. आमच्यातील काही सदस्यांनी जर आरक्षण उठविण्याबाबत उपसूचना दिल्या असतील तर त्यांना आम्ही त्याबाबत स्पष्टपणे नकार दाखवू. घरे आरक्षणाने बाधित होत असतील तरच त्याठिकाणच्या आरक्षणाबाबत महापौर व प्रशासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा कोणत्याही आरक्षण बदलाच्या उपसूचनेची दखल घेऊ नये, अशी मागणी यावेळी केली. 

हे तर दोन्ही कॉंग्रेसचे नाटक- माने
महापालिकेतील गोंधळ हा दोन्ही कॉंग्रेसकडून केलेले नाटक आहे. आरक्षणाचा विषय वादात सापडणार असल्याने दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी चर्चा करून सभा गुंडाळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच त्यांनी ही सभा मॅनेज केली होती, अशी टीका उपमहापौर गटाचे नेते शेखर माने यांनी केली. आम्ही यापुढेही बेकायदेशीर गोष्टींना थारा देणार नाही. मंगळवारी झालेल्या सभेतील एकाही ठरावाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये, अशी मागणी आम्ही विभागीय आयुक्तांकडे करण

घाबरणारी औलाद नाही!
महापौरांनी विषयांचे रितसर वाचन करण्याची सूचना नगरसचिवांना दिल्यानंतर सत्ताधारी गटनेते किशोर जामदार यांनी इतके तुम्ही का घाबरत आहात, असा सवाल केला. त्यावर महापौर शिकलगार म्हणाले, कोण घाबरत आहे? घाबरणारी ही औलाद नाही. आम्ही स्वच्छ असल्याने आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही, अशा शब्दात त्यांनी जामदारांना उत्तर दिले.

 

Web Title: Gundalali meeting: Sangli Congress-NCP members, Tu-Tu, me-I

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.