इस्लामपुरातील गुंड रवी खोत वर्षासाठी स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST2021-01-01T04:19:23+5:302021-01-01T04:19:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : खून, दरोडा, चोरी, वाटमारी अशा गंभीर स्वरुपाच्या वीसहून अधिक गुन्ह्यांची मालिका रचत शहर ...

Gund Ravi Khot in Islampur located for years | इस्लामपुरातील गुंड रवी खोत वर्षासाठी स्थानबद्ध

इस्लामपुरातील गुंड रवी खोत वर्षासाठी स्थानबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : खून, दरोडा, चोरी, वाटमारी अशा गंभीर स्वरुपाच्या वीसहून अधिक गुन्ह्यांची मालिका रचत शहर व परिसरात दहशत माजविलेल्या रवी ऊर्फ रवींद्र महावीर खोत या सराईत गुंडाला महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्याखाली वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्याची कारवाई पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केली.

शहराच्या अजिंक्यनगर परिसरातील मदिना कॉलनीत राहणारा रवी खोत हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या नावावर खुनाचे दोन, दरोड्यासह खुनाच्या प्रयत्नाचा एक, चोरीचे बारा, लुटमारीचे चार आणि विनयभंगाचा एक अशा एकूण २० गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी निरीक्षक देशमुख यांनी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार एका गुन्ह्यामध्ये सांगलीच्या कारागृहात असणाऱ्या रवींद्र खोत याच्याविरुद्ध स्थानबद्ध करण्याच्या आदेशाची बजावणी केली.

पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देशमुख, उपनिरीक्षक डी. पी. शेडगे, हवालदार शरद जाधव, प्रशांत देसाई, संदीप शेटे, भारत खोडकर, उमाजी राजगे, योगेश जाधव, चंद्रकांत कोळी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Web Title: Gund Ravi Khot in Islampur located for years