डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतीय संविधानातील बदल या विषयावर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:16 IST2021-03-30T04:16:30+5:302021-03-30T04:16:30+5:30
आष्टा येथील आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी येथे राजवैभव शोभा रामचंद्र यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ...

डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतीय संविधानातील बदल या विषयावर मार्गदर्शन
आष्टा येथील आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी येथे राजवैभव शोभा रामचंद्र यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रम पाटील यांनी केला. यावेळी प्रा. अमोल डांगे उपस्थित हाेते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमांतर्गत ‘भारतीय संविधानातील बदल’ या विषयावर व्याख्यान झाले. राधानगरी येथील लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक आणि राजगृह प्रकाशन, कोल्हापूरचे प्रकाशक, राजवैभव शोभा रामचंद्र यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. विक्रम पाटील म्हणाले, व्याख्यानामुळे सामान्य विद्यार्थ्यांमध्ये घटनेबद्दल जागृती होऊन भविष्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. राजवैभव रामचंद्र यांनी संविधानातील लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुलभूत हक्क, घटनेतील बदललेले कायदे यावर विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली.
संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब डांगे, सचिव अॅड. चिमण डांगे आणि कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे प्रतिवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत अशी माहिती एन.एस.एस. विभागाचे प्रमुख प्रा. अमोल डांगे यांनी दिली.
संस्थेचे सचिव, अॅड. चिमण डांगे, कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई, इंजिनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रम पाटील, रजिस्टार, प्रा. एस. बी. हिवरेकर, डीन अक्याडेमीक्स, डॉ. एस. व्ही. तारळकर, एन. एस. एस. विभागाचे प्रमुख, प्रा. अमोल डांगे. यांचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थी प्रतिनिधी प्रथमेश निकम, अभिषेक घाटगे, मोहर कांबळे, प्रथमेश धापटे, ऋतुजा यादव आणि भाग्यश्री माळी यांनी केले.