शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: गुढे पाचगणी पठार पर्यटकांना खुणावतोय, निसर्गसौंदर्याची भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 17:24 IST

सहदेव खोत  पुनवत : शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात असलेल्या निसर्गरम्य गुढे पाचगणी पठाराचे पर्यटकांमध्ये आकर्षण वाढत आहे. सध्या दिवसेंदिवस ...

सहदेव खोत पुनवत : शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात असलेल्या निसर्गरम्य गुढे पाचगणी पठाराचे पर्यटकांमध्ये आकर्षण वाढत आहे. सध्या दिवसेंदिवस येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. सुटीच्या दिवशी या परिसरात दूरवरून पर्यटक येत असून येथील वैविध्यपूर्ण दृश्यांचा आनंद लुटत आहेत.शिराळा तालुक्याच्या वैभवात भर टाकणारे गुढे पाचगणीचे पठार चांदोली अभयारण्यालगत आहे. या परिसरात निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. यावर्षीच्या चांगल्या पावसामुळे येथे सुंदर हिरवाई बहरली आहे. विविध प्राणी पक्षांचा वावर, देखणे डोंगर, उताराची शेती, कडेकपारीतील धबधबे, पाणवठे, पठारावरील पवनचक्क्या, घाट रस्ते, अधूनमधून नजरेस भरणारी वैविध्यपूर्ण शेती अन् येथे मिळणारा एकांत, अशा सर्व देणगीमुळे गुढे पाचगणी पठार सर्वांनाच आकर्षित करीत आहे.सध्या या पठारावर जागोजागी फुलोत्सव सुरू झाला आहे. कास पठाराप्रमाणेमुळे या ठिकाणी विविध जातीची बहुरंगी फुले नजरेस पडत आहेत. त्यामुळेच या परिसराला मिनी महाबळेश्वर संबोधले जात आहे. हे पठार उंचावर असल्याने येथून शिराळा पश्चिम भागातील निसर्ग चांदोली धरणासह अनुभवता येत आहे.चांदोली धरण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, गुढे पाचगणी पठार, उदगिरी पठार ही सर्वच ठिकाणे पश्चिम भागात असून पर्यटकांना एकाच वेळी या ठिकाणांना भेटी देऊन आनंद घेता येत आहे. यामुळे परिसरात गर्दी वाढत आहे.

या पठारावरील निसर्ग पाहिल्यानंतर प्रत्येकाचा आनंद द्विगुणित होत आहे. गुठे पाचगणी परिसर हा शिराळा तालुक्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे. वर्षा पर्यटनासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. त्यामुळे येथे दूरवरून पर्यटक येत आहेत. - अशोक जाधव, निसर्गप्रेमी, काष्ठशिल्पकार, चिंचोली

टॅग्स :Sangliसांगलीtourismपर्यटन