शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्रीच म्हणतात सांगलीत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा, पोलीस अधिकाऱ्यांना दिला इशारा

By श्रीनिवास नागे | Updated: September 30, 2022 16:27 IST

मोठे उद्योग राज्याबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान राज्याला मोठा प्रकल्प देण्याचे गाजर दाखवत असल्याची विरोधक टीका करीत आहेत. यावर मंत्री खाडे यांनी पंतप्रधान मोदी गाजर दाखवत नाहीत, ते विरोधकांना बांबूच दाखवतात, असे सांगितले.

सांगली : जिल्ह्यात खून, चोऱ्या घरफोड्या, अवैध व्यवसायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून पोलिसांसाठी हे शोभनीय नाही, असे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी यात सुधारणा करावी अन्यथा गृहविभागाला कळविणार असल्याचा इशारा खाडे यांनी दिला.पालकमंत्री खाडे यांनी जिल्ह्यातील नियोजन समितीसह सर्व शासकीय समित्या बरखास्त करण्यात आल्या असून नवीन समित्यांवर भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या निवडी करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हा नियोजन समितीने यापूर्वी मंजुरी दिलेल्या कामांना स्थगिती दिली आहे, मात्र त्यातील जनतेसाठी आवश्यक असलेली कामे सुरु करण्यात येतील. कामगारमंत्री म्हणून पूर्वीच्या कोणत्याही योजनांना स्थगिती दिलेली नाही. प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन व कामगारांसाठी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. संघटित कामगारांसाठी घरकुल योजना राबविण्यात येणार असून प्रधानमंत्री आवास योजनेतून पावणेतीन लाख कामगार मंत्रालयाकडून दोन लाख रुपये कामगारांच्या घरांसाठी देण्यात येतील. यापेक्षा अधिक लागणारी रक्कम कामगारांना कर्जरुपाने देण्याची योजना आहे. कामगारांना प्रशिक्षण व त्यांची परीक्षा घेण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचेही मंत्री खाडे यांनी सांगितले.महाविकास आघाडी शासनाने माझ्या मिरज मतदारसंघासाठी अडीच वर्षात काहीच निधी दिला नाही.मात्र मी मंत्री झाल्यानंतर अडीच महिन्यात तब्बल ९२ कोटी रुपये विकासनिधी आणला आहे. यात मिरज सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्त्यांसाठी ३२ कोटी व प्रमुख जिल्हा मार्ग, राज्यमार्ग, महापालिका क्षेत्रात रस्त्यांसाठी ५५ कोटी व ग्रामीण भागात मुलभूत सोयीसुविधांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती मंत्री खाडे यांनी दिली.पंतप्रधान मोदी गाजर नाही, विरोधकांना बांबूच दाखवतात!मोठे उद्योग राज्याबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान राज्याला मोठा प्रकल्प देण्याचे गाजर दाखवत असल्याची विरोधक टीका करीत आहेत. यावर मंत्री खाडे यांनी पंतप्रधान मोदी गाजर दाखवत नाहीत, ते विरोधकांना बांबूच दाखवतात, असे सांगितले. उद्योग बाहेर जाण्यास पूर्वीचे सरकारच कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप शिंदे गटाचे सरकार पुढील २५ वर्षे टिकेल व मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येईल. सांगलीत पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी नियोजन समिती बैठकीस पाचारण केले नसल्याच्या आ. गोपीचंद पडळकर यांच्या तक्रारीबाबत विचारणा केली असता जिल्हाधिकारी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना बैठकीस आमंत्रण देत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीguardian ministerपालक मंत्रीPoliceपोलिस