इस्लामपूर कृषी बाजार समितीत विलासराव शिंदे यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:41+5:302021-06-18T04:18:41+5:30
इस्लामपूर येथील कृषी बाजार समितीत मार्केटमधील हमालांना मास्क, सॅनिटायरचे वाटप करण्यात आले. यावेळी अल्लाउद्दीन चौगुले, आनंदराव पाटील, संपतराव पाटील, ...

इस्लामपूर कृषी बाजार समितीत विलासराव शिंदे यांना अभिवादन
इस्लामपूर येथील कृषी बाजार समितीत मार्केटमधील हमालांना मास्क, सॅनिटायरचे वाटप करण्यात आले. यावेळी अल्लाउद्दीन चौगुले, आनंदराव पाटील, संपतराव पाटील, बाबूराव पाटील, शंकरराव खांबे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कृषी उत्पन्न बाजार समिती, इस्लामपूरचे मुख्य कार्यालयात माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले, तसेच संस्थेच्या मुख्य बाजार आवारातील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये हमालांना सॅनिटायझर कीट वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हमालांच्या स्वच्छता व आरोग्यास अग्रकम देऊन बाजार समितीने हा उपक्रम राबविला आहे. यावेळी संस्थेचे सभापती अल्लाउद्दीन चौगुले, माजी सभापती आनंदराव पाटील, संचालक संपतराव पाटील, बाबूराव पाटील, हमाल प्रतिनिधी तसेच शंकरराव खांबे तसेच निखिल शहा व मार्केट यार्डातील सर्व आडते, व्यापारी व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.