शिगावात वीर शिवा काशीद यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST2021-07-15T04:19:29+5:302021-07-15T04:19:29+5:30
शिगाव : शिगाव (ता. वाळवा) येथे छत्रपती शाहू वाचनालय, मी शिगावकर, श्री सिद्धी फाऊंडेशन व समस्त नाभिक समाज यांच्यावतीने ...

शिगावात वीर शिवा काशीद यांना अभिवादन
शिगाव : शिगाव (ता. वाळवा) येथे छत्रपती शाहू वाचनालय, मी शिगावकर, श्री सिद्धी फाऊंडेशन व समस्त नाभिक समाज यांच्यावतीने नरवीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा. उदय पाटील म्हणाले, युवापिढीने इतिहासातील वीर योद्ध्यांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. इतिहासकालीन अनेक पुस्तके वाचनालयामध्ये वाचण्यास उपलब्ध करून दिली आहेत, पण सध्या व्हाॅट्सॲप, फेसबुक या सोशल मीडियाच्या दुनियेत वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. हे समाजाच्या दृष्टीने घातक आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावणे ही काळाची गरज बनली आहे. नरवीर शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना जातीय चौकटीत न बसवता त्यांचा आदर्श सर्व जाती-धर्मांनी घेतला पाहिजे.
यावेळी उल्हास फारणे, प्रकाश पवार, अभिजित पवार, अमोल पवार, आदी उपस्थित होते.
फोटो : शिगाव (ता. वाळवा) येथे वीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेला प्रा. उदय पाटील यांनी अभिवादन केले.