कवठेमहांकाळमध्ये वसंतराव नाईक, चंद्रसेन पवारांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:18 IST2021-07-02T04:18:44+5:302021-07-02T04:18:44+5:30

कवठेमहांकाळ : जिल्हा काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष चंद्रसेन पवार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात ...

Greetings to Vasantrao Naik and Chandrasen Pawar in Kavthemahankal | कवठेमहांकाळमध्ये वसंतराव नाईक, चंद्रसेन पवारांना अभिवादन

कवठेमहांकाळमध्ये वसंतराव नाईक, चंद्रसेन पवारांना अभिवादन

कवठेमहांकाळ : जिल्हा काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष चंद्रसेन पवार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनाही विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय हजारे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गुरव, कार्याध्यक्ष अविराजे शिंदे, शहराध्यक्ष राजाराम घोरपडे, तालुका सरचिटणीस अल्लबक्ष मुल्ला, उमाकांत परदेशी, कुलदीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते प्रा. दादासाहेब ढेरे, जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस वैभव गुरव, कुणाल कोठावळे, इब्राहिम शेख, सुदर्शन शिंदे, श्रीकांत फाकडे, मुबारक मुल्ला, सुनील वाघमारे, प्रकाश एडके, पप्पू देवकते, शिवाजी कारंडे, चैतन्य पाटील, आदी उपस्थित होते. राजू पोतदार यांनी आभार मानले.

Web Title: Greetings to Vasantrao Naik and Chandrasen Pawar in Kavthemahankal