वसंतराव नाईक यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:18 IST2021-07-02T04:18:14+5:302021-07-02T04:18:14+5:30

काँग्रेसच्या वतीने येथील काँग्रेस भवनात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ...

Greetings to Vasantrao Naik | वसंतराव नाईक यांना अभिवादन

वसंतराव नाईक यांना अभिवादन

काँग्रेसच्या वतीने येथील काँग्रेस भवनात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती सांगलीच्या काँग्रेस भवनात गुरुवारी साजरी करण्यात आली.

काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष महावीर पाटील व सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ढाेले म्हणाले की, १२ वर्षे महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताना वसंतराव नाईक यांनी सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला. त्यांचे योगदान महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. पाटील म्हणाले की, शेतीला प्राधान्य देऊन वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्र स्वयंपूर्ण करण्याचे काम केले. यावेळी देशभूषण पाटील, पंडितराव पवार, अशोक वारे, भीमराव चौगुले, विश्वासराव यादव, राजू भोरे, शरद गिड्डे, मौलाली वंटमोरे, पैगंबर शेख, नामदेव पाठाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Vasantrao Naik