विटा येथे विविध संस्थांकडून अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:26 IST2021-04-15T04:26:04+5:302021-04-15T04:26:04+5:30

विटा : विटा शहर व खानापूर तालुक्यात बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक यासह विविध संस्थांच्या ...

Greetings from various organizations at Vita | विटा येथे विविध संस्थांकडून अभिवादन

विटा येथे विविध संस्थांकडून अभिवादन

विटा : विटा शहर व खानापूर तालुक्यात बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक यासह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.

विटा येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने प्रदेश प्रतिनिधी माजी आ. अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांच्याहस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दलितमित्र विश्वनाथ कांबळे, नगरसेवक सुभाष भिंगारदेवे, अविनाश चोथे, उदय भिंगारदेवे, सावंता साठे, कैलास भिंगारदेवे, राहुल कांबळे, प्रमोद कांबळे, दीपक रणदिवे, सुभाष लांडगे, सुनील भिसे आदी उपस्थित होते.

मराठा सेवा संघ व संभाजी बिग्रेड यांच्यावतीनेही अभिवादन करण्यात आले. बुधवारी विटा शहरासह खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंती उत्सवाचे कार्यक्रम साधेपणाने साजरे करण्यात आले. सोशल डिस्टसिंगसह शासनाच्या जाहीर केलेल्या नियमांनुसार विटा शहरासह खानापूर तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

Web Title: Greetings from various organizations at Vita