इस्लामपूर येथे शरद जोशी यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:31 IST2021-09-04T04:31:25+5:302021-09-04T04:31:25+5:30
फोटो- इस्लामपूर येथे शरद जोशी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी रघुनाथदादा पाटील, शंकर बावडेकर, डी. के. कोपर्डेकर, हणमंतराव पाटील, ...

इस्लामपूर येथे शरद जोशी यांना अभिवादन
फोटो- इस्लामपूर येथे शरद जोशी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी रघुनाथदादा पाटील, शंकर बावडेकर, डी. के. कोपर्डेकर, हणमंतराव पाटील, धनपाल माळी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील शेतकरी संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयात ज्येष्ठ नेते शरद जोशी यांची जयंती साजरी करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस शंकर बावडेकर, करवीर तालुका अध्यक्ष डी. के. कोपर्डेकर यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, हणमंतराव पाटील, शंकरराव मोहिते, प्रदीप कार्वेकर, धनपाल माळी, रवी पाटील, माणिक पाटील, जगन्नाथ चिपरीकर, हंबीरराव पाटील, केतन जाधव, अनिता जाधव, सीमा मोरे, तन्वी पाटील, शब्बीर मुल्ला, शिवाजी थोरावडे, बाबासाहेब मगदूम, संतोष जंगम, वैभव दाईंगडे, हणमंत जाधव उपस्थित होते.