कामेरीत शामराव पाटील यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:27 IST2021-01-08T05:27:49+5:302021-01-08T05:27:49+5:30

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील कामेरी-येडेनिपाणी सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे संस्थापक शामराव पाटील (मामा) यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात ...

Greetings to Shamrao Patil in Kameri | कामेरीत शामराव पाटील यांना अभिवादन

कामेरीत शामराव पाटील यांना अभिवादन

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील कामेरी-येडेनिपाणी सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे संस्थापक शामराव पाटील (मामा) यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. भगवान कदम यांच्याहस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रणजित पाटील, युवराज पाटील, संजय पाटील, मारुती पाटील उपस्थित होते.

शामराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कर्मवीर शिक्षण संस्थेत त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी कर्मवीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान कदम, उपाध्यक्ष विलास बारपटे, सचिव प्रा. अनिल पाटील, मुख्याध्यापिका शैला पाटील तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

राजारामबापू पाटील विकास सेवा सोसायटीमध्ये विजयकुमार पाटील यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी संग्राम पाटील, निवास माने, सूर्याजी पाटील, संचालक विकास पाटील, राजेंद्र निंबाळकर उपस्थित होते.

फोटो : ०६ कामेरी १

ओळी : कामेरी (ता. वाळवा) येथे शामराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन भगवान कदम यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी रणजित पाटील, युवराज पाटील, संजय पाटील, मारुती पाटील उपस्थित होते.

Web Title: Greetings to Shamrao Patil in Kameri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.