सावित्रीबाई फुले यांना वाळव्यात अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:27 IST2021-01-08T05:27:30+5:302021-01-08T05:27:30+5:30

वाळवा : वाळवा येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. जिजामाता विद्यालयात शिक्षक सागर चिखले, शंभू इंगोले व विजय ...

Greetings to Savitribai Phule | सावित्रीबाई फुले यांना वाळव्यात अभिवादन

सावित्रीबाई फुले यांना वाळव्यात अभिवादन

वाळवा : वाळवा येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. जिजामाता विद्यालयात शिक्षक सागर चिखले, शंभू इंगोले व विजय माळी यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तर क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयात जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य डाॅ. सुषमा नायकवडी व संभाजीराव थोरातहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

जिजामाता विद्यालयात पाचवी ते नववीच्या विद्यार्थिनींसाठी वक्तृत्व स्पर्धा, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंधलेखन स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धा परीक्षक म्हणून शिक्षिका एस. के. नायकवडी, एस. आर. पाटील, शीतल निगळे यांनी काम पाहिले. शिक्षिका आर. व्ही. पाटील यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट मांडला. यावेळी प्रा. डाॅ. हाशिम वलांडकर, विजय जगताप, महाविद्यालय कर्मचारी परदेशी, शिक्षक, शिक्षिका, जिजामाता विद्यालय कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Savitribai Phule