बागणीत सराेजिनी बाबर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST2021-01-08T05:28:16+5:302021-01-08T05:28:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बागणी : बागणी (ता. वाळवा) येथे स्वातंत्र्यसैनिक, लेखिका, कवयित्री, संशोधक, संकलक, लोकसाहित्यिका, लोकपरंपरेच्या अभ्यासिका व बागणी ...

Greetings to Sarajini Babar in the garden | बागणीत सराेजिनी बाबर यांना अभिवादन

बागणीत सराेजिनी बाबर यांना अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क

बागणी : बागणी (ता. वाळवा) येथे स्वातंत्र्यसैनिक, लेखिका, कवयित्री, संशोधक, संकलक, लोकसाहित्यिका, लोकपरंपरेच्या अभ्यासिका व बागणी गावच्या सुकन्या डॉ. सरोजिनी बाबर यांची १०१ वी जयंती साजरी करण्यात आली.

सरपंच संतोष घनवट व उपसरपंच विष्णू किरतसिंग यांनी प्रतिमा पूजन करून आदरांजली वाहिली. यावेळी सरपंच घनवट यांनी डॉ. सरोजिनी बाबर यांचा जन्मदिन लोकसाहित्य दिन म्हणून साजरा करण्याची मागणी केली. ते म्हणाले, सरोजिनी बाबर या बागणी परिसरात आक्का या नावाने परिचित होत्या. दूरदर्शनवरील रानजाई या मालिकेने शांता शेळके यांच्यासह सरोजिनी बाबर यांनी महाराष्ट्राच्या घराघरात स्थान मिळविले. या मालिकेच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचे वास्तव दर्शन घडविले.

यावेळी ग्रामविकास अधिकारी नाना कारंडे, ग्रामपंचायत सदस्य मारुती बामणे, सतीश थोरात, कयुम चौगले, सिकंदर कराडकर, अरुण साखरे, अमोल कुदळे, बागणी विकास सोसायटीचे अध्यक्ष रमेश पाटील, सुधीर पाटील, हैदर नायकवडी, इस्लामपूर बाजार समितीचे सभापती अल्लाऊद्दीन चौगले, सतीश काईत, अमोल सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : ०७ बागणी १

ओळ : बागणी (ता. वाळवा) येथे सरोजिनी बाबर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच संतोष घनवट, उपसरपंच विष्णू किरतसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Greetings to Sarajini Babar in the garden