संपतराव देशमुख यांना कडेपूर येथे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:25 AM2021-05-17T04:25:48+5:302021-05-17T04:25:48+5:30

कडेपूर : टेंभू उपसा जल सिंचन योजनेचे शिल्पकार लोकनेते आमदार संपतराव देशमुख (आण्णा) यांना २५ व्या स्मृतीदिनानिमीत्त कडेपूर (ता. ...

Greetings to Sampatrao Deshmukh at Kadepur | संपतराव देशमुख यांना कडेपूर येथे अभिवादन

संपतराव देशमुख यांना कडेपूर येथे अभिवादन

Next

कडेपूर : टेंभू उपसा जल सिंचन योजनेचे शिल्पकार लोकनेते आमदार संपतराव देशमुख (आण्णा) यांना २५ व्या स्मृतीदिनानिमीत्त कडेपूर (ता. कडेगाव) येथे अभिवादन करण्यात आले.

कडेपूर येथे संपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन बंधू सयाजीराव देशमुख यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख, जयदीप देशमुख, सतीशराव देशमुख यांच्यासह कुटुंबीयांनी श्रध्दांजली अर्पण केली. तसेच कडेगांव, पलूस तालुक्यात विविध ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पध्दतीने नियमाचे पालन करत श्रध्दांजली वाहण्यात आली.

संपतराव देशमुख यांनी नेहमीच सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राजकारण, समाजकारण केले. तळागाळातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आपली शक्ती पणाला लावली. आण्णांच्या विचाराचा वारसा जोपासत देशमुख कुटुंबीयांची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीषण संकटात लोकांच्या मदतीसाठी देशमुख कुटुंबीय आणि कार्यकर्ते अहोरात्र काम करत आहेत. नागरिकांनीही नियम पाळून स्वतःला आणि कुटुंबीयांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन संग्रामसिंह देशमुख यांनी यावेळी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत कडेगाव, पलूस तालुक्यासह विविध भागात संपतराव देशमुख यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शाहीर यादव, हिंदुराव यादव, अविनाश यादव, सतीश यादव, नथुराम पवार, रामचंद्र महाडिक, लालासाहेब यादव, अमर यादव, पंजाबराव यादव, अजित यादव, रमेश माळी, उदय गुरव, अर्जुन चव्हाण उपस्थित होते.

फोटो : १६ कडेगाव १

ओळ : कडेपूर (ता. कडेगाव) येथे लोकनेते आमदार संपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस अभिवादन सयाजीराव देशमुख व मान्यवरांनी अभिवादन केले.

Web Title: Greetings to Sampatrao Deshmukh at Kadepur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.