इस्लामपुरात स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला क्रांतिकारकांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:31 IST2021-08-17T04:31:46+5:302021-08-17T04:31:46+5:30
इस्लामपूर येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. ...

इस्लामपुरात स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला क्रांतिकारकांना अभिवादन
इस्लामपूर येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. एल. डी. पाटील, उमेश कुरळपकर, संजय बनसोडे, प्रा. डॉ. अर्जुन पन्हाळे, वनिता बनसोडे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला क्रांतिकारक आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. शनिवारी, दि. १४ रोजी रात्री ११ वाजता पंचायत समितीच्या आवारातील क्रांतिसिंह नाना पाटील व नगरपालिकेतील हुतात्मा स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पंचायत समितीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास प्रा. एल. डी. पाटील व हुतात्मा स्तंभाला उमेश कुरळपकर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बसस्थानकापासून नगरपालिकेपर्यंत मशाल फेरी काढण्यात आली. भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो, हम सब एक है, इन्कलाब जिंदाबाद आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या घोषणा देत ही फेरी प्रमुख मार्गावरून नगरपालिकेत आली.
पालिकेतील हुतात्मा स्तंभाला प्रा. शामराव पाटील, संजय बनसोडे यांनी पुष्पहार अर्पण केला. प्रा. डॉ. अर्जुन पन्हाळे, प्रा. डॉ. प्रमोद गंगणमाले, योगेश कुदळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. व्ही. आर. जाधव यांनी स्वागत केले. डॉ. नितीन शिंदे, वनिता बनसोडे, विनोद मोहिते, एम. डी. जाधव, श्रावस्ती गंगणमाले उपस्थित होते. इंद्रजित पाटील यांनी संयोजन केले. प्रा.विष्णू होनमोरे यांनी आभार मानले.