कामेरी येथे राजारामबापूंना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST2021-01-18T04:24:59+5:302021-01-18T04:24:59+5:30
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध संस्थांच्यावतीने अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. कामेरी ...

कामेरी येथे राजारामबापूंना अभिवादन
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध संस्थांच्यावतीने अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.
कामेरी येडेनिपाणी पाणीपुरवठा संस्थेत संचालक संपत दाजी शेळके-पाटील व अध्यक्ष रणजित पाटील यांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी संचालक यशवंत पाटील, युवराज पाटील, शशिकांत पाटील, प्रमोद पाटील, युवराज पाटील, नागनाथ रास्कर, प्रदीप पाटील, शरद पाटील, बाजीराव पाटील, रंगराव पाटील सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
राजारामबापू पाटील विकास सेवा सोसायटी कामेरीमध्ये लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन संजय शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा नेते संग्राम पाटील, ग्रामपंचायत सदस्य पोपट कुंभार, अध्यक्ष निवास माने, उपाध्यक्ष सूर्याजी पाटील, संचालक विकास पाटील, पोपट कदम, जमाल मुल्ला, सुधीर आढाव, रंगराव पाटील, सर्जेराव पाटील, राजेश पाटील, बाबूराव कणसे, चंद्रकांत पाटील, अच्युतराव लोहार व सभासद उपस्थित होते.
कामेरी येथील भीमराव आण्णा सोसायटी, भैरवदेव पतसंस्था, ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.
फोटो ओळी-१७०१२०२१-आयएसएलएम- कामेरी राजारामबाप अभिवादन न्यूज
कामेरी येडेनिपाणी पाणीपुरवठा संस्थेत संचालक संपत दाजी शेळके-पाटील व अध्यक्ष रणजित पाटील यांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी संचालक यशवंत पाटील, युवराज पाटील, शशिकांत पाटील, प्रमोद पाटील, युवराज पाटील, नागनाथ रास्कर उपस्थित होते.