आष्टा, कारंदवाडीत राजारामबापूंना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:23 IST2021-01-18T04:23:55+5:302021-01-18T04:23:55+5:30
आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील महावीर नागरी सहकारी पतसंस्थेत राजारामबापू पाटील यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात ...

आष्टा, कारंदवाडीत राजारामबापूंना अभिवादन
आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील महावीर नागरी सहकारी पतसंस्थेत राजारामबापू पाटील यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष अरुण शिंदे, उपाध्यक्ष प्रकाश रसाळ, माजी अध्यक्ष तात्यासाहेब वग्यानी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच शिवाजीराव पवार, दीपक पाटील, मोहन जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अरुण शिंदे म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील यांनी वाळवा तालुक्याचे नंदनवन केले. कृषी, सहकार, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात तालुक्याचे नाव राज्यभर पोहोचवले. त्यांनी केलेले कार्य युवा पिढीला मार्गदर्शक आहे.
फोटो : १७ आष्टा १
ओळ : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील महावीर पतसंस्थेत राजारामबापू पाटील यांना अरुण शिंदे, तात्यासाहेब वग्यानी, प्रकाश रसाळ, शिवाजीराव पवार, दीपक पाटील, मोहन जाधव यांनी अभिवादन केले.