पंडितराव जाधव यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:19 IST2021-07-18T04:19:07+5:302021-07-18T04:19:07+5:30

कवठेमहांकाळ : लोकनेते पंडितराव जाधव यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त महांकाली हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शालेय गुणवत्ता पारितोषिक वितरण आणि ...

Greetings to Panditrao Jadhav on the occasion of Memorial Day | पंडितराव जाधव यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

पंडितराव जाधव यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

कवठेमहांकाळ : लोकनेते पंडितराव जाधव यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त महांकाली हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शालेय गुणवत्ता पारितोषिक वितरण आणि वृक्षारोपण कार्यक्रम झाला. मुख्याध्यापक एस. एन. भोसले यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

लोकनेते पंडितराव जाधव यांचा १६ वा स्मृतिदिन काेराेना नियमांचे पालन करून निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला. सहायक शिक्षिका सुमन सूर्यवंशी, एच. आर. साळुंखे, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य कुंडलिक कोडग यांनी पंडितराव जाधव यांच्या कार्याची माहिती दिली.

जनता शिक्षण संस्थेचे दिनकर जाधव, संभाजी पाटील, शमशुद्दीन पारेकर, मुख्याध्यापक सुनील भोसले, शिक्षक पी. एस. झांबरे, एम. बी. माने यांच्याहस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. जनता शिक्षण संस्थेच्या चारही शाखेचे प्रमुख, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आण्णांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी जनता शिक्षण संस्थेचे सचिव अशोकराव जाधव यांनीही मार्गदर्शन केले. वाङ्मय विभागप्रमुख बी. सी. कवाळे, किशोर वाघमारे, शमशुद्दीन पारेकर यांनी सूत्रसंचालन केले. के. एम. तेली यांनी आभार मानले.

Web Title: Greetings to Panditrao Jadhav on the occasion of Memorial Day