समृद्धी इंडस्ट्रीजमध्ये नारायणजी मालू यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:21 IST2021-01-09T04:21:50+5:302021-01-09T04:21:50+5:30

कुपवाड : अनब्रेकेबल प्लास्टिकमधील भारतातील नंबर एक ब्रॅण्ड असलेल्या समृद्धी इंडस्ट्रीजचे आधारस्तंभ नारायणजी ऊर्फ भाईजी मांगीलाल मालू यांच्या पुण्यतिथीनिमित्त ...

Greetings to Narayanji Malu at Samrudhi Industries | समृद्धी इंडस्ट्रीजमध्ये नारायणजी मालू यांना अभिवादन

समृद्धी इंडस्ट्रीजमध्ये नारायणजी मालू यांना अभिवादन

कुपवाड : अनब्रेकेबल प्लास्टिकमधील भारतातील नंबर एक ब्रॅण्ड असलेल्या समृद्धी इंडस्ट्रीजचे आधारस्तंभ नारायणजी ऊर्फ भाईजी मांगीलाल मालू यांच्या पुण्यतिथीनिमित्त संवेदना या सामाजिक संस्थेच्या कार्याला सहकार्य म्हणून इमारत निधीकरता एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. हा धनादेश डॉ. दिलीप शिंदे यांना प्रदान करण्यात आला.

सांगलीतील समृद्धी इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या मुख्य कार्यालयात यानिमित्ताने प्रतिमेचे पूजन व पुष्पहार गीतादेवी नारायणजी मालू, समृद्धीचे संचालक रमाकांत मालू, ओमप्रकाश मालू, प्रमोद मालू यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी समृध्दी कंपनीचे सेल्स नॅशनल हेड आर. टी. पाटील, एचआर विभागाच्या हेड डॉ. ज्योती यादव, लिगल हेड किरण कुलकर्णी, व्यवस्थापक सुरेश पवार, राजेंद्र लोहिया प्रमुख उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी भाईजींच्या आठवणींना उजाळा दिला. याचबरोबर कुपवाड वृद्ध सेवाश्रमातील ज्येष्ठांना कंपनीतर्फे मदत करण्यात आली.

फोटो-०८कुपवाड१

फोटो ओळ : सांगलीत समृद्धी इंडस्ट्रीजच्या कार्यालयात नारायणजी ऊर्फ भाईजी मांगीलाल मालू यांच्या पुण्यतिथीनिमित्त गीतादेवी नारायणजी मालू, समृद्धीचे संचालक रमाकांत मालू, ओमप्रकाश मालू, प्रमोद मालू याच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. दिलीप शिंदे, समृद्धीचे सेल्स नॅशनल हेड आर. टी. पाटील प्रमुख उपस्थित होते.

Web Title: Greetings to Narayanji Malu at Samrudhi Industries