येलूर येथे नानासाहेब महाडिक यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:27 IST2021-05-12T04:27:13+5:302021-05-12T04:27:13+5:30

येलूर सहकारी पाणी पुरवठा संस्थेत नानासाहेब महाडिक यांच्या प्रतिमेचे पूजन गोविंदराव जाधव, धनाजीराव पाटील, भगवानराव जाधव, सरदार गायकवाड, भास्करराव ...

Greetings to Nanasaheb Mahadik at Yelur | येलूर येथे नानासाहेब महाडिक यांना अभिवादन

येलूर येथे नानासाहेब महाडिक यांना अभिवादन

येलूर सहकारी पाणी पुरवठा संस्थेत नानासाहेब महाडिक यांच्या प्रतिमेचे पूजन गोविंदराव जाधव, धनाजीराव पाटील, भगवानराव जाधव, सरदार गायकवाड, भास्करराव जाधव यांच्याहस्ते करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

येलूर : येलूर (ता. वाळवा) येथे विविध संस्थांमध्ये नानासाहेब महाडिक यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कोरोनामुळे पुण्यतिथी कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत, सहकारी पाणीपुरवठा येलूर नंबर १, येलूर नंबर २, ग्रुप सोसायटी येथे नानासाहेब महाडिक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

येलूर सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या वारणा कारखान्याचे संचालक गोविंदराव जाधव, जय जवान जय किसान संस्थेचे अध्यक्ष धनाजीराव पाटील यांच्याहस्ते व संस्थेचे अध्यक्ष भगवानराव जाधव, उपाध्यक्ष सरदार गायकवाड, भास्करराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नानांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आो. यावेळी संदीप पाटील, दिलीप शिनगारे, संस्थेचे सचिव विजय जाधव उपस्थित होते.

येलूर ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच बाळासाहेब जाधव यांच्याहस्ते नानासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी रंजित आडके, विनायक महाडिक, विजय पाटील शशिकांत कुंभार, अभिजित जाधव उपस्थित होते.

Web Title: Greetings to Nanasaheb Mahadik at Yelur