मिरजेत स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:21 IST2021-05-29T04:21:19+5:302021-05-29T04:21:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांना जयंतीनिमित्त मिरजेत दत्त चौक, रिक्षा मंडळातर्फे सावरकर यांच्या पुतळ्यास ...

मिरजेत स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांना जयंतीनिमित्त मिरजेत दत्त चौक, रिक्षा मंडळातर्फे सावरकर यांच्या पुतळ्यास भाजप प्रदेश सचिव मकरंद देशपांडे व ज्येष्ठ नागरिक विनय गोखले यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, मोहन वाटवे, भाजप शहराध्यक्ष राजेंद्र नातू, राजाभाऊ देसाई, महेश चिप्पलकट्टी, राजेंद्र जोशी, मोहन जोशी, अमित पटवर्धन, वाय.सी. कुलकर्णी, माधव गाडगीळ, श्रेयस गाडगीळ, सुंदर पाठक, बंडोपंत कुलकर्णी, राजू पाटील, बाळासाहेब विभुते, संजय गोडबोले, श्रीमती विद्याताई रानडे, दत्त चौक रिक्षा मंडळ सदस्य व सावरकरप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी स्वा. सावरकर अमर रहे, वंदे मातरम् या घोषणा देण्यात आल्या. सावरकर समितीचे बंडोपंत कुलकर्णी, राजेंद्र पाटील यांनी संयोजन केले.