ऐतवडे बुद्रुकमध्ये कर्मवीरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:27 IST2021-05-10T04:27:05+5:302021-05-10T04:27:05+5:30

ऐतवडे बुद्रुक (ता.वाळवा) येथे ग्रामपंचायतीच्या कर्मवीर सभागृहात आयोजित स्मृतिदिन कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी सरपंच प्रतिभा बुद्रुक, उपसरपंच ...

Greetings to Karmaveer in Aitwade Budruk | ऐतवडे बुद्रुकमध्ये कर्मवीरांना अभिवादन

ऐतवडे बुद्रुकमध्ये कर्मवीरांना अभिवादन

ऐतवडे बुद्रुक (ता.वाळवा) येथे ग्रामपंचायतीच्या कर्मवीर सभागृहात आयोजित स्मृतिदिन कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी सरपंच प्रतिभा बुद्रुक, उपसरपंच अशोक दिंडे, वारणा बँकेचे संचालक अरविंद बुद्रुक, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय कोळी, शशिकांत शेटे, नूतन पोलीस उपनिरीक्षक विजय आवटी, जितेंद्र पाटील, प्रशांत कुंभार व ग्रामस्थ यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

अभिजित पाटील यांनी कर्मवीरांच्या पुतळ्यास अभिवादन केले. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच प्रतिभा बुद्रुक, उपसरपंच अशोक दिंडे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सन्मती संस्कार मंच, कर्मवीर दूध संस्था, हनुमान दूध संस्था, ग्रामपंचायत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले सहकारी रुग्णालयाचे उपाध्यक्ष अजित पाटील, साई क्लिनिक, अक्षय क्लिनिक, सेवायोग क्लिनिक येथे डॉ. अनिल बुद्रुक, डॉ. कुबेर पाटील, डॉ. राकेश राजमाने, डॉ. प्रमोद पाटील यांनी प्रतिमेस हार घालून अभिवादन केले.

सन्मती संस्कार मंचचे संघटक प्रा. वर्धमान बुद्रुक म्हणाले, शिक्षणातून समाजाेन्नती हीच भावना जोपासून कर्मवीर अण्णांनी शिक्षणाचा पाया रचला. हाच विचार व वारसा जोपासत गावच्या विकासाचा लेखाजोखा तयार करून गावातील विकासकामे मार्गी लावत आहोत.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य महावीर पाटील, प्रकाश माळी, गजानन शिरतोडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. वर्धमान बुद्रुक यांनी स्वागत केले. दादासाहेब कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो : ०९ ऐतवडे १

ओळ : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अभिजित पाटील, सरपंच प्रतिभा बुद्रुक, उपसरपंच अशोक दिंडे, शशिकांत शेटे, अजित पाटील, महावीर पाटील यांनी अभिवादन केले.

Web Title: Greetings to Karmaveer in Aitwade Budruk