हणमंतराव पाटील यांना विविध संस्थांतर्फे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST2021-09-26T04:28:01+5:302021-09-26T04:28:01+5:30

पेठ ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच चंद्रकांत पवार आणि माजी उपसरपंच शंकर पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत ...

Greetings to Hanamantrao Patil from various organizations | हणमंतराव पाटील यांना विविध संस्थांतर्फे अभिवादन

हणमंतराव पाटील यांना विविध संस्थांतर्फे अभिवादन

पेठ ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच चंद्रकांत पवार आणि माजी उपसरपंच शंकर पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. मरिमी देवी ग्रुपतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप डॉ. अभिराज पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष शेखर बोडरे, समाजिक कार्यकर्ते विठ्ठल मदने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अरुण सातपुते, प्रकाश पाटणेकर, संतोष गायकवाड, सुरेश सातपुते, प्रसाद मदने, प्रतीक्षा पाटणेकर उपस्थित होते.

शेडगेवाडी येथील आत्मशक्ती पतसंस्थेच्या शाखेतर्फे बाजीराव शेडगे, डाॅ. तानाजी पाटील, डाॅ. दिनकर झाडे, शंकर शेडगे, पांडुरंग पाटील यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप, तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी शाखाधिकारी प्रमोद पेठकर, सतीश कुंभार, जालिंदर जाधव उपस्थित हाेते. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मदने यांच्या घरी हणमंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन रामोशी समाजाचे अध्यक्ष मोहनराव मदने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आत्मशक्ती पतसंस्थेचे अध्यक्ष हंबीरराव पाटील, प्रदीप पाटील, प्रताप पाटील, संतोष गायकवाड, विकास पाटील, जयराज पाटील, प्रसाद मदने, सुनील सपकाळ उपस्थित होते.

आत्मशक्ती पतसंस्थेचे उपाध्यक्ष अंबादास पेठकर यांच्या घरी संचालक एम. एस. पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी विकास पेठकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आत्मशक्ती पतसंस्थेच्या सात शाखांमध्येही मान्यवरांच्या हस्ते हणमंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

फोटो : २५ पेठ १

ओळी : पेठ (ता. वाळवा) येथील आत्मशक्ती समूहाचे शिल्पकार हणमंतराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मरिमी देवी ग्रुपतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. अभिराज पाटील, शेखर बोडरे, विठ्ठल मदने, प्रताप पाटील उपस्थित हाेते.

Web Title: Greetings to Hanamantrao Patil from various organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.