पेठ येथे हणमंतराव पाटील यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:25 IST2021-04-18T04:25:47+5:302021-04-18T04:25:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील आत्मशक्त्ती समूहाचे संस्थापक हणमंतराव पाटील यांंना जयंतीनिमित्त विविध संस्थांकडून अभिवादन ...

पेठ येथे हणमंतराव पाटील यांना अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील आत्मशक्त्ती समूहाचे संस्थापक हणमंतराव पाटील यांंना जयंतीनिमित्त विविध संस्थांकडून अभिवादन करण्यात आले.
आत्मशक्त्ती पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात युवक नेते अभिजीत पाटील, आत्मशक्त्ती महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा पूनम सागर पाटील, सागर पाटील व संस्थेचे अध्यक्ष हंबीरराव पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. उपाध्यक्ष अंबादास पेठकर, शेखर बोडरे, प्रदीप पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. मुसाअल्ली जमादार, संजय पाटील, धनपाल जाधव उपस्थित होते.
हंसाजीराव बळवंतराव पाटील विद्यालयात सागर पाटील व पूनम पाटील याच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. कृष्णा बँकेचे माजी संचालक फिरोज ढगे, सी.एच. पाटील, मुख्याध्यापक एस.बी. पाटील, शशिकांत जाधव, संजय कांबळे उपस्थित होते. आत्मशक्त्ती महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेमध्ये संस्थेच्या अध्यक्षा पूनम पाटील व अभिजीत पाटील यांच्या हस्ते हणमंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरण झाले. अंजना पाटील, पतंग पाटील, भानुदास गुरव, स्वाती भाबुरे, रेश्मा धोत्रे आदी उपस्थित होते. विपुल प्रतिष्ठानच्या वतीने हणमंतराव पाटील यांची जयंती साजरी करता आली. अंबादास पेठकर याच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. विकास पेठकर, प्रमोद पेठकर आदी उपस्थित होते.