गोपीनाथ मुंडे यांना सांगलीत अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST2020-12-13T04:39:56+5:302020-12-13T04:39:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती सांगलीत भाजपच्यावतीने साजरी करण्यात आली. प्रतिमेस ...

Greetings to Gopinath Munde in Sangli | गोपीनाथ मुंडे यांना सांगलीत अभिवादन

गोपीनाथ मुंडे यांना सांगलीत अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती सांगलीत भाजपच्यावतीने साजरी करण्यात आली. प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात जयंती कार्यक्रम पार पडला. गाडगीळ यांनी मुंडेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. ते म्हणाले की, गोपीनाथ मुंडे हे सर्वार्थाने लोकनेते होते. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना सर्वसामान्य जनतेसाठी त्यांचे कार्यालय सदैव उघडे असे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून घेऊन संबंधितांना त्यासंबंधी कार्यवाही करण्याचे आदेश ते लगेच देत असत. म्हणून भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना अतिशय जिव्हाळ्याचे नेते म्हणून ते परिचित होते.

यावेळी आ. सुरेशभाऊ खाडे, जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, महापौर गीताताई सुतार, उपमहापौर आनंदा देवमाने, गटनेते युवराज बावडेकर, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, गणपती साळुंखे, प्रथमेश वैद्य, अनिकेत खिलारे आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Gopinath Munde in Sangli