पुनवत येथे मान्यवरांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST2021-08-17T04:32:02+5:302021-08-17T04:32:02+5:30
पुनवत : पुनवत (ता. शिराळा) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने कोविड व पूर आपत्तीच्या काळात गावात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात ...

पुनवत येथे मान्यवरांचा सत्कार
पुनवत : पुनवत (ता. शिराळा) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने कोविड व पूर आपत्तीच्या काळात गावात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
पुनवत येथे कोरोना तसेच काही दिवसांपूर्वी आलेल्या पूर आपत्तीच्या काळात अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी उल्लेखनीय काम केले. या कामाची दखल घेत ग्रामपंचायतीने डॉ. नितीन कांबळे, पोलीस पाटील बाबासाहेब वरेकर, ग्रामसेविका तेजश्री आतकिरे, तलाठी सुजाता वंजारी, महावितरणचे कर्मचारी सागर पाटील, आरोग्य विभागाचे अविनाश फातले, संगीता जाधव, आशा सेविका राजश्री पाटील, रुपाली माने, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक गुरव, दिलीप पाटील, सुरेश गुरव, आपत्ती काळात गावाला पाणी पुरवठा करणारे नाथाजी पाटील, प्रणाली भोळे आदींचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला.
यावेळी सरपंच वंदना शेळके, उपसरपंच गणपती शेळके, तानाजी पाटील, दत्तात्रय आंदळकर, रामचंद्र नाईक, बाबासाहेब आंदळकर, शोभाताई सुतार, गणपती पाटील, नामदेव यादव, महादेव शेळके, सुनील सकटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.