मल्लेवाडी, कवलापूरच्या पदाधिकाऱ्यांचे बापूंना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:24 IST2021-02-12T04:24:02+5:302021-02-12T04:24:02+5:30

इस्लामपूर : मिरज तालुक्यातील मल्लेवाडी व कवलापूरच्या नूतन सरपंच, उपसरपंचांनी राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. ...

Greetings to Bapu from the office bearers of Mallewadi, Kavalapur | मल्लेवाडी, कवलापूरच्या पदाधिकाऱ्यांचे बापूंना अभिवादन

मल्लेवाडी, कवलापूरच्या पदाधिकाऱ्यांचे बापूंना अभिवादन

इस्लामपूर : मिरज तालुक्यातील मल्लेवाडी व कवलापूरच्या नूतन सरपंच, उपसरपंचांनी राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. युवा नेते प्रतीक पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

मल्लेवाडीचे सरपंच विनायक पाटील, उपसरपंच वर्षा भोसले तसेच कवलापूरच्या सरपंच शुभांगी नलवडे, उपसरपंच सौरभ पाटील यांनी बापूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेतील बुथ कमिटीचे अध्यक्ष म्हणून विनायक पाटील यांनी उत्कृष्ट काम करीत गावच्या सरपंचपदापर्यंत मजल मारली आहे.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, सदस्य भानुदास पाटील, प्रमोद पाटील, सतीश खाडे, कुमार माळी, सुषमा पाटील, उज्ज्वला गुडे उपस्थित होते.

फोटो ओळी : ११०२२०२१-आयएसएलएम-अभिवादन न्यूज

राजारामनगर येथे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास मल्लेवाडी आणि कवलापूर ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. यावेळी प्रतीक पाटील, बाळासाहेब होनमोरे, शहाजी पाटील उपस्थित होते.

Web Title: Greetings to Bapu from the office bearers of Mallewadi, Kavalapur