‘म्हैसाळ’च्या पाण्याला ग्रीन सिग्नल

By Admin | Updated: December 17, 2015 01:21 IST2015-12-17T00:08:59+5:302015-12-17T01:21:32+5:30

एकनाथ खडसेंची ग्वाही : सुमनतार्इंसह राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

Green signal for 'mhasal' water | ‘म्हैसाळ’च्या पाण्याला ग्रीन सिग्नल

‘म्हैसाळ’च्या पाण्याला ग्रीन सिग्नल

कवठेमहांकाळ : म्हैसाळ योजनेचे पाणी सुरु होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बुधवारी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत यासाठी ग्रीन सिग्नल दाखविताना, सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही मदत आणि पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील आणि आमदार सुमनताई पाटील हे सर्व मुख्यमंत्र्यांना भेटणार होते. गुरूवारी ही योजना कधी सुरू होणार, या संदर्भातील अधिकृत घोषणा के ली जाणार होती. या भेटीचा तपशील रात्री उशिरापर्यंत समजू शकला नाही. पाणीप्रश्नी नागपूर अधिवेशनात उपोषणाला बसण्याचा इशारा कवठेमहांकाळ तालुक्याच्या दौऱ्याप्रसंगी आ. सुमनताई पाटील यांनी दिला होता.पाणी योजनांची थकबाकी माफ व्हावी, योजनेचे वीज बिल टंचाई निधीतून भरावे, म्हैसाळ योजना तात्काळ सुरू करावी, यासाठी मंगळवारी सकाळी सुमनताई पाटील, आमदार गणपतराव देशमुख आ. जयंत पाटील आ. विद्या चव्हाण, आ. दीपिका चव्हाण, आ. ज्योती कलाणी, आ. कपिल पाटील विधानभवनाच्या पायरीवर उपोषणाला बसले. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट व शिक्षण मंत्री विनोद तावडे तात्काळ उपोषणस्थळी आले. बापट यांनी बुधवारी बैठक लावणार असल्याचे सांगितले. बैठकीत ठोस उपाययोजना करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील यांनी उपोषण पाठीमागे घेत असल्याचे जाहीर केले.
बुधवारी दुपारी हरिभाऊ बागडे यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला बागडे, एकनाथ खडसे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय बापू शिवतारे, अजित पवार, आ. पतंगराव कदम, आ. सुमनताई पाटील, आ. गणपतराव देशमुख, आ. विलासराव जगताप, आ. शिवाजीराव नाईक आ. अनिल बाबर, आ. सुरेश खाडे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता उपासे, अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्यासह पाटबंधारे ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. योजना सुरू करण्याबाबतीत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे. बुधवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार होते. (वार्ताहर)

वीजबिलात सवलतीचेही आश्वासन
या बैठकीत खडसे यांनी दुष्काळी भागातील बळिराजाला वाचवण्यासाठी म्हैसाळ योजना चालू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला. योजना पुन्हा चालू करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनीही वीजबिलात सवलत देण्याच्ो आश्वासन दिले.

Web Title: Green signal for 'mhasal' water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.